• Home
  • राजकारण
  • भाजपच्या ट्रोलिंगला बळी पडून पूजा मोरे यांनी उमेदवारी घेतली मागे; अश्रू अनावर
Mumbai

भाजपच्या ट्रोलिंगला बळी पडून पूजा मोरे यांनी उमेदवारी घेतली मागे; अश्रू अनावर

Emotional Pooja More after withdrawing her candidature due to trolling

Pooja More candidature withdrawal : सध्या महापालिका निवडणुकांची रेलचेल सुरु आहे.अशातच पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पूजा मोरे (जाधव) सध्या चर्चेत आहे. परंतु सध्या त्यांच्या जुन्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आणि भाजप नेत्यांच्या टीकेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांना पक्षातून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत असून कंटाळून त्यांनी निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी मागे घेत असताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : 2026 मध्ये ‘या’ 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार; त्या राज्यात सध्या कोणाचं आहे सरकार?

कोण आहे पूजा मोरे

पूजा मोरे या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार म्हणून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून लढल्या होत्या. त्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या. समाज माध्यमांवर झालेल्या ट्रोलिंगमुळे त्यांनी उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. आणि त्या ढसाढसा रडल्या. आणि त्यांच्यावर करण्यातलेल्या षडयंत्राबाबत त्यांनी आरोप केले. (Pooja More candidature)

काय आहे व्हायरल व्हिडीओ

पूजा मोरे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भातील जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते विधान मी केले नसल्याचे पूजा मोरे यांचे म्हणणे आहे. तर 15 ऑगस्ट रोजी मांसबंदीच्या विरोधात चिकन वाटप केल्याचाच व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या जुन्या व्हिडीओ वरून त्यांना ट्रॉल करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts