Breaking News :
  • Home
  • देश
  • गुड न्युज…! क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये टॉप 50 मध्ये भारतातील कुठल्या संस्थानी मिळवले स्थान..!
Top News

गुड न्युज…! क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये टॉप 50 मध्ये भारतातील कुठल्या संस्थानी मिळवले स्थान..!

jnu delhi

QS World University Rankings : देशातील शैक्षणिक संस्थासाठी गुड न्युज एक समोर आली आहे. लंडनमधील क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीने रँकिंग जारी केली आहे. ही रॅकिंग भारतासाठी ऐतिहासिक ठरली आहे. त्यामुळे भारतीय संस्थांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.  भारतातील IIT, Jawaharlal Nehru University (JNU) आणि Birla Institute of Technology and Science Pilani (BITS पिलानी) यांसारख्या प्रमुख संस्थांनी जागतिक टॉप 50 मध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे भारतातील शिक्षण संस्थांना बुस्टर डोस मिळाला आहे.

21,000 पेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रमांचे विश्लेषण

या रँकिंगमध्ये 100 हून अधिक देशांतील 1,900 विद्यापीठांमधील 21,000 पेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रमांचे विश्लेषण करण्यात आले. ते 55 विषय आणि पाच व्यापक क्षेत्रांमध्ये विभागलेले आहेत.

विविध विषय क्षेत्रांमध्ये आघाडी

भारताने यंदा विविध विषय क्षेत्रांमध्ये टॉप 50 मधील 27 स्थान मिळवली आहेत, 2024 मधील 12 स्थानांच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहेत. ही उल्लेखनीय वाढ 12 वेगवेगळ्या संस्थांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शक्य झाली आहे. त्यामुळे भारतीय शैक्षिणक संस्थाचा शैक्षणिक आलेख उंचावला आहे.

‘मार्केटिंग’ या जागतिक रँकिंग विषयात आपली नोंद

वैयक्तिक कामगिरीत Indian School of Mines Dhanbad यांनी खनिज आणि खाण अभियांत्रिकीमध्ये जागतिक स्तरावर 21 वे स्थान मिळवले. तसेच Indian Institute of Management Ahmedabad यांनी बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि मार्केटिंग या दोन्ही विषयांत 21 वे स्थान मिळवले. विशेष म्हणजे भारताने प्रथमच ‘मार्केटिंग’ या जागतिक रँकिंग विषयात आपली नोंद केली आहे. Indian Institute of Technology Delhi यांनी या आवृत्तीत उत्कृष्ट कामगिरी करत सहा कार्यक्रम टॉप 50 मध्ये स्थान मिळवले आहे.

शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा

Indian Institute of Technology Bombay, Indian Institute of Technology Kharagpur आणि Indian Institute of Technology Madras यांनी देखील टॉप 50 मध्ये आपली जागा बनवली आहे. याशिवाय JNU आणि BITS पिलानी यांनीही आपली शैक्षणिक प्रतिष्ठा जागतिक स्तरावर सिद्ध केली आहे.

भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेची वाढती जागतिक विश्वासार्हता

IIT दिल्लीने केमिकल इंजिनिअरिंग (48 वे), इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (36 वे) आणि कॉम्प्युटर सायन्स (45 वे) या विषयांमध्ये भारताचे स्थान राखले आहे. एकूणच, ही रँकिंग भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेची वाढती जागतिक विश्वासार्हता आणि उज्ज्वल भवितव्य दर्शवते.

सीईओ जेसिका टर्नर यांची प्रतिक्रिया

भारताच्या प्रगतीबद्दल प्रतिक्रिया देताना QS च्या सीईओ Jessica Turner यांनी भारताचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की यावर्षी भारताची प्रगती ही गुणवत्ता आणि जागतिक स्पर्धात्मकतेत झालेल्या वाढीचे प्रतीक आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील सुधारणांचा विस्तार एका अशा प्रणालीचे द्योतक आहे जी ठाम उद्दिष्टांसह वेगाने पुढे जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts