• Home
  • राजकारण
  • Raj Thackeray Election Commission : बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्या तर जास्त दिवस लागत असेल तर लागू द्या; असेही ५ वर्ष लागलेत; अजून ६ महिने लागले तर काय फरक पडतो..? निवडणूक आयोगाला राज ठाकरेंचा थेट सवाल
Top News

Raj Thackeray Election Commission : बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्या तर जास्त दिवस लागत असेल तर लागू द्या; असेही ५ वर्ष लागलेत; अजून ६ महिने लागले तर काय फरक पडतो..? निवडणूक आयोगाला राज ठाकरेंचा थेट सवाल

चाणक्य नीती या वस्तू दान केल्यास गरीब व्यक्ती देखील होऊ शकतो करोडपती 4

सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यानुषंगाने काल राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर आज देखील या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी याद्या द्या, आम्ही शाहनिशा करू, अशी मागणी केली आहे.

काल आणि आज राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्राच्या विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि दिग्गज नेते शरद पवार उपस्थित होते. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी विविध मुद्दे मांडत बैठकीत सवाल उपस्थित केले.

एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका

“राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही? मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी ? तुम्ही निवडणूकाच घेऊ नका असा घाला राज ठाकरे यांनी घातला. जो पर्यंत सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका, सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना सुनावले.

 हे हि वाचा : बिहार निवडणुकीपूर्वी लालू यादव यांच्या कुटुंबाला मोठा धक्का; IRCTC प्रकरणात आरोप निश्चित

आम्ही तयार नाही, निवडणूक पुढे ढकला

“बाळासाहेब थोरात हे आठ टर्म आमदार असून ते  80-90 हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने कसकाय पडले, हे कसे शक्य?” असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नाही. निवडणूक पुढे ढकला“ या प्रश्नावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना उत्तर देखील देता आले नाही. आमचे तुमचे करत बसू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. राजकीय पक्षांना क्लियर झाल्याशिवाय तुम्ही निवडणुकाच घेऊ नका, निवडणूक कार्यक्रम रद्द करा अशी मागणीही राज ठाकरे यांनी जोर धरून ठेवली.

आणखी ६ महिने लागलेत तर काय फरक पडतो

निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. पाच वर्षात निवडणूक घेतली नाही, आता अजून सहा महिने निवडणुका घेऊ नका, राजकीय पक्षांसाठी सत्ताधारींसाठी काम करताय असं दिसतंय, असा आरोप निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांनी केला. तसेच बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्या तर जास्त दिवस लागत असेल तर लागू द्या, असेही पाच वर्षे लागलेत, आणखी ६ महिने लागलेत तर काय फरक पडतो. असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts