• Home
  • राजकारण
  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल 28 पूर्वी येणार; VRS कंपनीची तपासणी पूर्ण
Top News

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल 28 पूर्वी येणार; VRS कंपनीची तपासणी पूर्ण

Accident report 28 ago

Accident report 28 ago : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्याशी संबंधित अपघाताचा अंतिम तपास अहवाल 28 तारखेपूर्वी सादर होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, वाहनांची तपासणी आणि संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. घटना ज्या परिसरात घडली त्या ठिकाणच्या VRS कंपनी परिसराची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळील हालचाली, सुरक्षा नोंदी आणि गेटवरील नोंदवहीची पडताळणी करण्यात आली.

हेही वाचा – राज्यसभेसाठी जोरदार लॉबिंग; शरद पवारांच्या नावावरुन सस्पेन्स कायम, भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता, VRS कंपनीकडून फुटेज देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. फुटेज उपलब्ध करून देण्यास कंपनीने तांत्रिक/प्रशासकीय कारणे दिल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया राबवून फुटेज जप्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तपासाची दिशा

अपघात नेमका कशामुळे झाला, वाहतुकीची परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित वाहनचालकांची भूमिका याचा सखोल तपास सुरू आहे. अहवाल आल्यानंतरच नेमकी जबाबदारी निश्चित होणार आहे. एकूणच, 28 तारखेपूर्वी अहवाल सादर होणार असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts