Breaking News :
  • Home
  • देश
  • लष्करी खर्चाचा सरकारी तिजोरीवर भार; रशियावर सोने विक्रीचा मार; बाजारावर काय परिणाम?
Top News

लष्करी खर्चाचा सरकारी तिजोरीवर भार; रशियावर सोने विक्रीचा मार; बाजारावर काय परिणाम?

gold

Russia’s Gold Sales : अर्थसंकल्पीय तूट (Budget deficit) आणि लष्करी खर्चाचा (Military Expenditure) सरकारी तिजोरीवर भार पडत आहे. त्याचा परिणाम रशियाच्या व्लादिमीर पुतिन (valdimir putin) सरकारवर झाला आहे. लष्करी खर्चाचा वाढणारा दबाव रशियाला पेलणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे रशिया सरकारने आपल्या मध्यवर्ती बँकेच्या राखीव निधीतून सोन्याची विक्री सुरु केली आहे. गेल्या २५ वर्षात अशा प्रकारची वेळ रशियन सरकारवर आली आहे.

हे ही वाचा: नोकियातील नोकर कपात; भारतीयांवर आफत ?

रशिया सरकारची अर्थसंकल्पीय तूट

जगभरातील अनेक देशांनी लष्करी खर्च वाढवला आहे. त्यात रशिया देखील भरडला गेला आहे. त्यातच रशिया सरकारला अर्थसंकल्पीय तूट जाणवू लागली आहे. त्यामुळे ही अर्थसंकल्पीय तूट भरून कशी काढावी असा प्रश्न रशिया सरकारसमोर आहे. त्यामुळे रशियाने आपल्या मध्यवर्ती बँकेच्या राखीव निधीतून सोन्याची विक्री सुरू केली आहे. सोन्याची विक्री सुरु करून रशियाने अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय तुटीवर नियंत्रण ठेवणे रशियन सरकारला यश येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोन्याचा साठा नीचांकी पातळीवर

रशियाचा सोन्याचा साठा नीचांकी पातळीवर गेला आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या कोंडीवर मात करण्यासाठी रशियाने पावले उचलायला सुरवात केली आहे. म्हणून सुरक्षित मानला जाणारा राखीव निधीदेखील वापरावा लागत आहे. २०२२ ते २०२५ दरम्यान १५ ट्रिलियन रुबल (अंदाजे १५० अब्ज डॉलर्स) पेक्षा जास्त किमतीचे सोने आणि परकीय चलन रशियन सरकारने विकले आहे.

फेब्रुवारीमध्ये अतिरिक्त २,००,००० औंस सोन्याची विक्री

दरम्यान, केवळ २०२६ च्या पहिल्या दोन महिन्यांतच अतिरिक्त ३.५ ट्रिलियन रुबल (३५ अब्ज डॉलर्स) किमतीचा साठा विकला गेला आहे.रशियाच्या सेंट्रल बँकेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये अंदाजे ३,००,००० औंस सोन्याची विक्री झाली, तर फेब्रुवारीमध्ये अतिरिक्त २,००,००० औंस सोन्याची विक्री झाली.

दुसरा सर्वात मोठा सोने उत्पादक देश

रशियाकडे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्यांपैकी एक असून, त्यांच्या केंद्रीय बँकेकडे २,३०० टनांपेक्षा जास्त (सुमारे $३८४ अब्ज मूल्य) भौतिक सोन्याचा साठा आहे, ज्यामुळे ते सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत जगातील पाचवा सर्वात मोठा देश ठरतो. रशिया जगातील दुसरा सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे.

रशियातील सोन्याबद्दल मुख्य बाबी

साठा: रशियाच्या तिजोरीत मार्च २०२६ पर्यंत २,३०० टनांहून अधिक सोन्याचे साठे आहेत.

उत्पादन: रशिया दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्पादन करतो, जे जागतिक उत्पादनाच्या सुमारे १० टक्के आहे.

नवीन शोध: रशियामध्ये नुकतेच नवीन सोने खाणी सापडल्या असून, ज्यात १०० टन सोने असल्याचा अंदाज आहे.

वापर: युद्धजन्य परिस्थितीत आणि आर्थिक निर्बंधांमुळे, रशिया आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी या सोन्याच्या साठ्याचा वापर करत आहे.

निर्बंधांचा परिणाम: पाश्चात्य देशांच्या निर्बंधांनंतर, रशियाने आपल्या डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts