Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • काँग्रेसला जास्त जागा लढण्याची खुमखुमी आलीय; संजय राऊतांची मित्रपक्षावर जहरी टीका
Top News

काँग्रेसला जास्त जागा लढण्याची खुमखुमी आलीय; संजय राऊतांची मित्रपक्षावर जहरी टीका

Sanjay Raut
47

Sanjay Raut: महाविकास आघाडीतील जागावाटपावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत “काँग्रेसला अधिक जागा लढायच्या असतील तर लढा द्या. त्यांना खुमखुमी आहे,”असे वक्तव्य केले.

महाराष्ट्रातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा आणखी वाढताना दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका करत “काँग्रेसला अधिक जागा लढायच्या असतील तर लढू द्या, त्यांना खुमखुमी आहे,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.

हेही वाचा: नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी हवाई दलाची मदत घेण्याचा प्रस्ताव; प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर टोला 

काय म्हणाले संजय राऊत?

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, काही मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही. आपण लढलं पाहिजे,” असे ते म्हणाले. विशेषतः कोकणातील जागांबाबत पक्षात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राऊत यांनी हेही स्पष्ट केले की या मुद्द्यावर उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. “आज ना उद्या निर्णय लागेल,” असे सांगत त्यांनी आघाडी टिकून राहील असा संकेत दिला; मात्र काँग्रेसवर अप्रत्यक्ष दबावही टाकला.

महाविकास आघाडीत नेमका वाद कशामुळे?

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे प्रमुख पक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर आता विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जागावाटपावरून संघर्ष सुरू झाला आहे.

काँग्रेसकडून अधिक जागांची मागणी होत असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाढलेल्या कामगिरीमुळे पक्ष अधिक आक्रमक भूमिकेत असल्याचे मानले जाते. मात्र शिवसेना ठाकरे गटाला वाटते की त्यांच्या पक्षाने अनेक ठिकाणी काँग्रेसला मदत केली आणि त्याचा योग्य सन्मान काँग्रेसकडून होत नाही.

“आम्ही काँग्रेससाठी जागा सोडल्या” – राऊत

यापूर्वीही संजय राऊत यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, “आम्ही काँग्रेससाठी तीन लोकसभा जागांचा त्याग केला.” कोल्हापूर, रामटेक आणि अमरावतीसारख्या जागांचा उल्लेख करत त्यांनी दावा केला होता की, शिवसेनेच्या मदतीमुळे काँग्रेसला यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसने स्वतःला “मोठा भाऊ” समजू नये, असा इशाराही त्यांनी दिला होता.

राऊत यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली होती. काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर देताना अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात आणि आघाडीमध्ये सर्व पक्ष समान आहेत, असे स्पष्ट केले होते.

हेही वाचा: अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम; आता बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्ही देखरेख अनिवार्य

काँग्रेसची भूमिका काय?

काँग्रेसकडून अधिकृतपणे संघर्षाचे चित्र नाकारले जात असले तरी पक्षातील अनेक नेते अधिक जागांसाठी आग्रही असल्याचे दिसते. महाराष्ट्र काँग्रेसचे काही नेते म्हणातात की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारवर्ग वाढला असून त्यानुसार विधानसभा जागावाटप झाले पाहिजे.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना काँग्रेसची ही भूमिका अस्वस्थ करणारी वाटत आहे. त्यामुळे जागावाटपाच्या बैठका वारंवार पुढे ढकलल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर मोठे आव्हान

महाविकास आघाडी टिकवून ठेवणे हे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी मोठे राजकीय आव्हान बनले आहे. भाजप आणि महायुतीविरोधात एकसंघ लढाई देण्यासाठी तिन्ही पक्षांना एकत्र राहणे आवश्यक मानले जाते. मात्र जागावाटपावरून वाढणारा तणाव भविष्यात आघाडीच्या एकजुटीवर परिणाम करू शकतो.

राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत जागावाटपावरून आणखी राजकीय संघर्घ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

भाजपकडूनही टीका

महाविकास आघाडीतील या वादावर भाजप नेत्यांनीही टीका केली आहे. “ज्यांच्यात स्वतःमध्ये एकमत नाही ते महाराष्ट्राला स्थिर सरकार कसे देणार?” असा सवाल भाजपकडूनउपस्थित केला जात आहे. त्यामुळे विरोधकांतील अंतर्गत मतभेद हे महायुतीसाठी राजकीय फायदा ठरू शकतात, असे मानले जात आहे.

पुढे काय?

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही. मात्र संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील तणाव उघड झाला आहे. येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यातील बैठका निर्णायक ठरणार आहेत.

राज्यातील आगामी निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी एकसंध राहते की अंतर्गत मतभेद आणखी वाढतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts