Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी हवाई दलाची मदत घेण्याचा प्रस्ताव; प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर टोला
Top News

नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी हवाई दलाची मदत घेण्याचा प्रस्ताव; प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर टोला

Priyanka Chaturvedi Statement NEET Exam Security: प्रश्नपत्रिका वाहतुकीसाठी एअरफोर्सच्या विमानांचा विचार करावे. नेव्ही सबमरीनचाही वापर करा असा उपरोधिक सल्ला देण्यात आला आहे.

येत्या २१ जून रोजी होणारी नीट- युजी परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराशिवाय आणि पूर्ण सुरक्षेसह पार पाडण्यासाठी केंद्र सरकार भारतीय हवाई दलाची मदत घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रश्नपत्रिका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या विमानांचा वापर करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा: अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम; आता बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्ही देखरेख अनिवार्य

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या पर्यायावर चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसून हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठेवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रस्तावावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर उपरोधिक टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ” आता भारतीय वायुसेना परीक्षा प्रश्नपत्रिका पोहोचवणार आहे. ठीक आहे.” दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी टोला लागवत म्हटले की, ” उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवरून उचलून सर्व्हरवर अपलोड करण्यासाठी नेव्हीच्या सबमरीनचाही वापर करा.”

प्रियंका चतुर्वेदी यांनी पुढे लिहिले की, “प्रश्नपत्रिका आर्मीच्या प्रिटिंग सेंटरमधून उचलल्या जातील, त्यानंतर सैन्याच्या बुलेटप्रूफ वाहनांतून त्या जवळच्या एकरबेसपर्यंत नेल्या जातील आणि भारतीय हवाई दल त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवेल,” असा उपरोधिक उल्लेख त्यांनी केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःनीट परीक्षेच्या तयारीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची माहिती त्यांनी दिली जात असून, प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाई, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेपर्यंत सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts