• Home
  • बिजनेस
  • सेन्सेक्स 146 तर निफ्टी 47 अंकांनी घसरणीसह उघडला; ‘या’ शेअर्सचा लाल रंगात सुरु झाला व्यवहार
Top News

सेन्सेक्स 146 तर निफ्टी 47 अंकांनी घसरणीसह उघडला; ‘या’ शेअर्सचा लाल रंगात सुरु झाला व्यवहार

Share Market Crash

Share Market : आज देशांतर्गत शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीसह लाल रंगात उघडला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी, बीएसई सेन्सेक्स 146.36 अंकांनी (0.18%) घसरुन 82,480.40 वर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 50 निर्देशांक देखील 47.50 अंकांनी (0.19%) घसरुन 25,423.60 वर उघडला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजार लक्षणीय घसरणीसह बंद झाला होता हे लक्षात घ्यावं. शुक्रवारी, सेन्सेक्स 1048.16 अंकांनी (1.25%) घसरुन 82,626.76 वर उघडला होता आणि निफ्टी 336.10 अंकांनी (1.30%) घसरुन 25,471.10 वर उघडला होता.

निफ्टी 50 पैकी 34 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात उघडले :

सोमवारी, सेन्सेक्सच्या 30 पैकी 15 शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात उघडले, तर उर्वरित 15 शेअर्स नुकसानासह लाल रंगात उघडले. त्याचप्रमाणे, निफ्टी 50 पैकी फक्त 16 शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात उघडले, तर उर्वरित 34 शेअर्स नुकसानासह लाल रंगात उघडले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, टाटा ग्रुप आयटी कंपनी टीसीएस आज सर्वाधिक 1.03 टक्के वाढीसह उघडली, तर अदानी पोर्ट्स आज सर्वाधिक 1.07 टक्के घसरणीसह उघडले.

सेन्सेक्सचे उर्वरित शेअर्स आज कसे उघडले? :

सेन्सेक्सच्या इतर समभागांमध्ये, पॉवर ग्रिडचे शेअर्स 0.71 टक्के, एचसीएल टेक 0.57 टक्के, आयटीसी 0.30 टक्के, एनटीपीसी 0.29 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.27 टक्के, एशियन पेंट्स 0.27 टक्के, टेक महिंद्रा 0.21 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.17 टक्के, एचडीएफसी बँक 0.17 टक्के, सन फार्मा 0.10 टक्के, इंडिगो 0.09 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर 0.09 टक्के, बजाज फायनान्स 0.08 टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीज 0.01 टक्के वधारले.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण :

दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 0.94 टक्के, इन्फोसिसचे 0.72 टक्के, बीईएलचे 0.68 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटचे 0.64 टक्के, टाटा स्टीलचे 0.57 टक्के, महिंद्रा अँड महिंद्राचे 0.56 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाचे 0.52 टक्के, टायटनचे 0.51 टक्के, एल अँड टीचे 0.48 टक्के, अ‍ॅक्सिस बँकचे 0.42 टक्के, मारुती सुझुकीचे 0.31 टक्के, ट्रेंटचे 0.29 टक्के, भारती एअरटेलचे 0.24 टक्के आणि इटरनलचे 0.02 टक्के घसरण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts