• Home
  • ताज्या बातम्या
  • ५०० कोटींचा घोटाळा आणि भाजपची उमेदवारी? शिवाजीराव भोसले बँकेचे ठेवीदार रस्त्यावर
Pune

५०० कोटींचा घोटाळा आणि भाजपची उमेदवारी? शिवाजीराव भोसले बँकेचे ठेवीदार रस्त्यावर

Shivajirao Bhosale Bank Depositors Protest

Shivajirao Bhosale Bank Scam BJP Candidature : भाजपच्या अधिकृत उमेदवार रेश्मा भोसले यांच्या विरोधात श्री शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ठेवीदार संतप्त झाले आहेत. बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत. ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार, या गैरव्यवहारामुळे बँकेमार्फत सुमारे ५०० कोटी रुपयांची गंभीर आर्थिक अनियमितता झाली आहे. आमचे पैसे परत द्या.. या मागणीसाठी ठेवीदार रस्त्यावर उतरले आहेत.

हेही वाचा – जिल्हा परिषदांचा धुरळा उडणार! १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

शिवाजीराव भोसले बँकेत ज्यांचे लाखो रुपये अडकले आहेत अशा ठेवीदारांनी पैसे परत भावनिक वाद पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या अधिकृत उमेदवार रेश्मा भोसले या बँकेच्या संचालक होत्या. सहकार कायद्यानुसार, सहकार खात्याच्या अखत्यारीतील संस्थांमधील गैरव्यवहाराची जबाबदारी ही सर्व संचालकांची संयुक्त असते. मात्र, रेश्मा भोसले यांना आजपर्यंत अटक झालेली नाही. उलट, त्यांना बक्षीस म्हणून की काय केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिलीय.

भ्रष्टाचाराशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली

भ्रष्टाचाराशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे मतदान करण्याची इच्छाच उडाली आहे. आम्ही वारंवार मुरलीधर मोहोळ यांना भेटलो, देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले, परंतु अजूनही या प्रकरणावर कोणताही तोडगा निघालेला नाही, असं ठेवीदारांनी सांगितलंय.

वयोवृद्ध ठेवीदारांची अवस्था अत्यंत बिकट

आमची एकच मागणी आहे आमचे पैसे आम्हाला मिळावेत. वयोवृद्ध ठेवीदारांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, अशा प्रतिक्रिया शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी दिल्या. मागील ५ ते ६ वर्षांपासून ठेवीदार न्यायासाठी लढा देत आहेत. आम्ही जास्त काही बोललो तर चार दिवस राहू की नाही, याचीही भीती वाटते, अशी व्यथा ठेवीदारांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts