Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • सिंहगड उड्डाणपूल 66 ठिकाणी तोडण्यात येणार; अजित पवारांनी व्यक्त केली इंजिनियर्सवर तीव्र नाराजगी
Pune

सिंहगड उड्डाणपूल 66 ठिकाणी तोडण्यात येणार; अजित पवारांनी व्यक्त केली इंजिनियर्सवर तीव्र नाराजगी

Sinhgad flyover in Pune facing demolition at 66 locations after engineering lapses

Sinhgad flyover demolition : पुणे जिल्ह्यातील उड्डाणपुलाच्या चुकीच्या रचनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले आहे. त्यांनी उड्डाणपूलाची रचना केलेल्या इंजियर्सवर तीव्र नाराजगी व्यक्त केली असून तीव्र संताप व्यक्त करताना अजित पवार दिसले.

पुणे शहरात अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेले बहुतांश उड्डाणपूलाची चुकीच्या पद्धतीने रचना करण्यात आली हे. पाटील इस्टेटचा उड्डाणपूल, हडपसरचा उड्डाणपूल, किंवा नॉन-स्टॉप उड्डाणपूल, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील आणि स्क्वेअर चौकातील उड्डाणपूलाची रचना आणि नियोजन पूर्णपणे चुकलेले आहे. त्यामुळे आता हे उड्डाणपूल पाडण्याची वेळ आली आहे. मागील 20 वर्षांपासून पुण्याचे पालमंत्री असलेले अजित दादा यांच्या हस्तेच या सर्व उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले आहे. हे विशेष. तरीही या उड्डाणपुलाच्या चुकीच्या रचनेचा दोष इंजिनियर फोडला जात असल्याचे सवाल उपस्थित होत आहे. आता या चुकीला खरंच जबाबदार आहे तरी कोण ?

हे ही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपूर येथे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास शिखर बैठक संपन्न

अजित पवार अधिकाऱ्यांवर संतापले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंहगड पु मेट्रो मार्गासाठी 66 ठिकाणी तोडण्यात येणार असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याकारणाने पुन्हा वाहतूक कोंडी होऊन स्थानिकांना पुन्हा पच्छाताप होऊ शकतो. यामुळे अजित पवार अधिकाऱ्यांवर संतापले आहे. आता पुलाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या पुलाचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले होते. मेट्रोमार्गासाठी हा पूल 66 ठिकाणी तोडण्यात येणार असून 23 कोटी रुपये खर्च या कामासाठी लागणार आहे. आता याला जबाबदार आहे तरी कोण असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

सप्टेंबर महिन्यात पुण्यातील सिंहगड रस्त्यावर राजाराम पुल ते फन टाईम या दोन किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. नियोजित मेट्रो मार्ग सिंहगड रस्त्यावरू जाणार असल्यामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुंनी रॅम्पमध्ये मेट्रोच्या पिलरची उभारणी करण्यात आली असली तरीही उड्डाणपुलादरम्यान येणाऱ्या मेट्रो पिलरसाठी उड्डाणपूल ६६ ठिकाणी तोडण्यात येणार आहे. आणि हे काम देखील पुढील काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts