• Home
  • ताज्या बातम्या
  • टीम इंडियाचा विश्वविजय! न्यूझीलंडवर मात करत T20 विश्वचषक जिंकून रचला इतिहास
Top News

टीम इंडियाचा विश्वविजय! न्यूझीलंडवर मात करत T20 विश्वचषक जिंकून रचला इतिहास

india

IND vs NZ | काल (8 मार्च) अहमदाबादमधील (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या संघांमध्ये टी-20 विश्वचषक 2026 (T-20 World Cup 2026) चा अंतिम सामना पार पडला. भारतीय संघ आणि न्यूझीलंडमध्ये चुरशीचा सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडवर मात करत दमदार असा विजय मिळवला आहे. 96 धावांनी मात करत भारतीय संघांनं टी-20 विश्वचषक विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर चाहत्यांनी स्टेडियमवर एकच जल्लोष केला होता.

हेही वाचा – न्यूझीलंडच्या कर्णधाराचे जिव्हारी लागणारे शब्द, सुर्यकुमार यादवने दिलं सडेतोड उत्तर

भारतीय संघानं सर्वाधिक धावा करत रचला इतिहास

अंतिम सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत पाच गडी गमावून 255 धावा केल्या. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघ 19 षटकांत 159 धावा करून सर्वबाद झाला. विशेष म्हणजे टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघानं सर्वाधिक धावा करत मोठा इतिहास रचला आहे.

सुरूवातील भारतीय संघानं नाणेफेक गमावली होती. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. तर भारतीय संघानेही हे आव्हान स्विकारत भारताच्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार अशी सुरूवात केली. त्यांनी 98 धावा करत शानदार अशी कामगिरी केली. अभिषेकने 21 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या तर संजू सॅमसनने 46 चेंडूंमध्ये 89 धावा केल्या. या दोघांसोबत इशान किशनने देखील धमाकेदार अशी खेळी केली. त्याने 25 चेंडूत 54 धावा करत अर्धशतक ठोकले. तर यावेळी सूर्यकुमार यादव चांगलीच कामगिरी करू शकला नाही. हार्दिक पांड्यानेही 13 चेंडूंमध्ये 18 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर न्यूझीलंडच्या जेम्स नीशमने तीन विकेट घेतल्या.

भारतानं दिलेलं लक्ष्य पूर्ण करणं न्यूझीलंडसाठी ठरलं मोठं आव्हान

दुसरीकडे, भारतीय संघानं दिलेलं लक्ष्य पूर्ण करणं न्यूझीलंडसाठी मोठं आव्हान ठरलं होतं. न्यूझीलंडच्या टिम सेफर्ट आणि फिव अॅलन या खेळाडूंनी 31 धावा केल्या. यामध्ये टिम सेफर्टने 26 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या, ज्यात त्याने दोन चौकार आणि पाच षटकार लगावले. डॅरिन मिशेलने 11 चेंडूंमध्ये 17 धावा केल्या. तर मिशेल सँटनरने 35 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचे सात फलंदाज एकेरी अंकी धावसंख्येवर बाद झाले. तर टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर, अक्षर पटेलने तीन विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

सर्वाधिक धावा करत भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी

विशेष सांगायचं झालं तर, कालच्या सामन्यात भारतीय संघानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टी-20 क्रिकेटच्या सुरूवातीपासूनच टीम इंडीयानं या फॉरमॅटवर वर्चस्व गाजवले आहे. आत्तापर्यंत भारतीय संघ हा 50 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त धावा करणारा संघ ठरला आहे. तर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका हा संघ आहे. या संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 वेळा 200 पेक्षा जास्त धावा करत इतिहास रचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts