Top News

आफ्रिकेविरूद्ध विराटचं सलग दुसरं शतक, नवा विक्रम नोंदवला..

Virat Kohli Century

Virat Kohli Century : टीम इंडियाचा माजी कर्णधार किंग विराट कोहली एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला आहे. रांचीत पहिल्या सामन्यात तुफान फटकेबाजी करत आज बुधवारी पुन्हा दुसऱ्या सामन्यातही विराट कोहलीने जोरदार खेळी करत अगदी थाटात शेतकी खेळी केली. यावेळी समोर येणाऱ्या सर्व गोलंदाजांना घाम फोडण्याचं काम विराटने केलं. त्याच्या माऱ्यापुढे काही प्रमाणात अचूक गोलंदाजी करताना आफ्रिकेचे गोलंदाज पाहायला मिळाले. या मालिकेतील सलग दुसऱ्या शकतामुळे त्याच्या नावे नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा – भारतानं 20व्यांदा गमावली नाणेफेक; प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण, संघात कोणतेही बदल नाही

पहिल्या सामन्यात त्याने 135 धावा

कोहलीने 90 चेंडूत त्याचे 53 वे एकदिवसीय शतक झळकावले. हे त्याचे सलग दुसरे शतक आहे. पहिल्या सामन्यात त्याने 135 धावा केल्या होत्या. हा सलग तिसरा सामन्यात त्याचा 50+ स्कोर आहे. एक दिवसीय सामन्यांपूर्वी कोहलीने सिडनीमध्ये अर्ध शकत झळकावलं होतं. त्यामुळे विराट सध्या जबरदस्त फार्म मध्ये असल्याचं दिसून येत आहे.

विराटनंतर एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो

विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 11 वेळा शतके करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. सलग एकदिवसीय डावांमध्ये शतके ठोकण्याच्या यादीत विराटनंतर एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो, ज्याने सहा वेळा असे केले आहे. गेल्या तीन डावांमध्ये विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाची झोप उडवली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या मागील तीनही एकदिवसीय डावांमध्ये शतके ठोकली आहेत. यापूर्वी, त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 101 धावा केल्या होत्या. त्याने चालू मालिकेतील दोन्ही डावांमध्ये शतकेही ठोकली आहेत.

102 धावा विराट कोहली माघारी..

विराट कोहली 102 धावांवर बाद झाला. कोहलीने 93 चेंडूत 102 धावा केल्या, त्यात 7 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने ऋतुराजसोबत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. ऋतुराज 105 धावांवर बाद झाला. भारतीय संघाची पारी ३५८ धावांवर ५ वर समाप्त झाली. दक्षिण आफ्रिका संघासमोर आता ३५९ धावाचं मोठं लक्ष असणार आहे. त्यामुळ विराट आणि श्रतुराज याचं शकत भारतीय संघाच्या विजयासाठी फायदेशीर ठरणार का? हे पाहाणं महत्ताचं ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts