Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • देशाचं लक्ष लागलेल्या बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आघाडीवर; किती आहे मॅजिक फिगर?
ताज्या बातम्या

देशाचं लक्ष लागलेल्या बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आघाडीवर; किती आहे मॅजिक फिगर?

कोलकाता West Bengal Assembly Election : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील 294 विधानसभा जागांपैकी 293 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. फलता विधानसभा जागेसाठी 21 मे रोजी फेरमतदान होणार असून, 24 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. बंगालमध्ये 25 जिल्ह्यांमधील 77 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी 533 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व 77 मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सध्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आघाडीवर असल्यावर दिसतंय.

हेही वाचा : आसाम-बंगालसह पाच राज्यांच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु; कोण मारणार बाजी, देशातं

बंगालमध्ये बहुमतासाठी किती जागांची आवश्यकता :

पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 विधानसभा जागा आहेत. त्यामुळं राज्य विधानसभेत बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत पार पडल्या. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी 152 जागांसाठी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 142 जागांसाठी मतदान झालं.

फलता मतदारसंघात 21 मे रोजी मतदान :

परंतु फलता मतदारसंघात आता 21 मे रोजी मतदान होईल आणि 24 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. 29 एप्रिलच्या निवडणुकीत गंभीर निवडणूक अनियमिततेचे आरोप झाले होते. परिणामी, आता 293 जागांसाठी निकाल जाहीर केला जाईल.

एजंट्सना क्यूआर-आधारित ओळखपत्रं जारी :

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बंगालमधील 77 मतमोजणी केंद्रांमध्ये 459 हॉल आहेत, जिथं मतमोजणी होणार आहे. पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी, मनोज कुमार अग्रवाल यांनी माहिती दिली आहे की, सर्व एजंटांना क्यूआर-आधारित ओळखपत्रं देण्यात आली आहेत, ज्याचा वापर प्रवेशासाठी केला जाईल. त्यांनी सांगितले की, शांततापूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे आणि टीम पूर्णपणे तयार आहे.

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts