Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • तामिळनाडूत सर्वात मोठा उलटफेर! पहिल्याच निवडणुकीत थलपती साकारणार ‘विजय’? सत्ताधारी DMK चं काय होणार?
Top News

तामिळनाडूत सर्वात मोठा उलटफेर! पहिल्याच निवडणुकीत थलपती साकारणार ‘विजय’? सत्ताधारी DMK चं काय होणार?

थलपती विजय बनला तामिळनाडूचा 'जननायक'; पहिल्याच निवडणुकीत TVK ला कसा मिळाला ब्लॉकबस्टर विजय? वाचा सविस्तर

चेन्नई Assembly Election Results : देशात सध्या चार राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तामिळनाडूमध्येही मतमोजणी सुरु झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा असून, 23 एप्रिल रोजी सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या. आता राज्यात मतमोजणी सुरु झाल्याने कोणता नेता जिंकेल आणि कोण हरेल हे आज स्पष्ट होईल. सर्व जागांसाठी मतमोजणी आधीच सुरु झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार इथं सर्वात मोठा उलटफेर होताना पाहायला मिळत आहे. कारण पहिल्यांदाच निवडणुक लढवणाऱ्या थलपती विजयचा पक्ष टीव्हीके 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी स्टॅलिनचा पक्ष डीएमके तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय.

हेही वाचा : आसाम-बंगालसह पाच राज्यांच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु; कोण मारणार बाजी, देशातं

तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी किती जागांची गरज :

प्रत्येक राज्याची स्वतःची विधानसभा असते, ज्यात जागांची संख्या वेगवेगळी असते. कोणत्याही विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी एकूण जागांच्या निम्म्याहून अधिक जागांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी, कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 234 पैकी निम्मे, म्हणजेच 117, आणि त्यात आणखी एक जागा मिळवून एकूण 118 जागांची आवश्यकता असेल. जो पक्ष किंवा आघाडी हा आकडा पार करेल, ते राज्यात सरकार स्थापन करतील. राज्यातील जनतेनं कोणत्या पक्षाला/आघाडीला निवडून दिलं आहे, हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.

मागील निवडणुकीतील आकडेवारी काय होती? :

मागील निवडणुकीत, एआयएडीएमके आणि भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांनी एकूण 75 जागा जिंकल्या. तर दुसरीकडे, डीएमके आणि काँग्रेससह त्यांच्या मित्रपक्षांनी एकूण 157 जागा जिंकल्या. आता डीएमके आपली सत्ता राखणार की थलपती पहिल्याच निवडणुकीत इतिहास रचणार हे सायंकाळपर्यंत कळेल.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts