Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Kritika Kamra Wedding: अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर कृतिका कामरा अडकली विवाहबंधनात; लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल
मनोरंजन

Kritika Kamra Wedding: अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर कृतिका कामरा अडकली विवाहबंधनात; लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल

Kritika Kamra Wedding

Kritika Kamra Wedding Photos Viral: टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा आणि अभिनेता गौरव कपूर नुकतेच विवाहबंधनातअडकले आहेत. त्यांच्या विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिने अभिनेता आणि क्रिकेट होस्ट गौरव कपूरसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ संध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: Gudi Padwa 2026: या वर्षी गुढी पाडवा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि परंपरा

कृतिका कामरा बराच काळ गौरव कपूरला डेट करत होती. दोघेही अनेक वर्षापासुन रिलेशनशिपमध्ये होते. अखेर त्यांनी मुंबईमध्ये कुटूंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. या खास सोहळ्यात फारच मोजके पाहुणे उपस्थित होते.

लग्नासाठी कृतिकाने अतिशय आकर्षक असा लूक केला होता. तिने लाल रंगाची सिल्क साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला होता. सिल्व्हर ज्वेलरी, ग्लॉसी मेकअप आणि मोकळे केस यामुळे तिचा लूक अधिकच उठून दिसत होता. तर गौरव कपूरने गोल्डन रंगाचा सूट घातला होता आणि तोही खूपच देखणा दिसत होता. दोघांची जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

लग्नानंतर कृतिका आणि गौरव यांनी मीडियासमोर खास पोज देत सर्वांचे आभार मानले. दोघेही खूप आनंदी दिसत होते. त्यांनी उपस्थितांना लग्नाची मिठाईही वाटली. त्यांच्या लग्नातील रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.

कृतिका आणि गौरव यांनी 11 मार्च रोजी रजिस्टर मॅरेज केले असून 12 मार्च रोजी लग्नानंतर खास सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली आहे. या पार्टीला अनेक कलाकार आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कृतिका कामरा नुकतीच ‘द ग्रेट शमसुद्दीन’ या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने आतापर्यंत अनेक मालिका, शो, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्यांच्या लग्नानिमित्त चाहत्यांकडून आणि मित्रपरिवाराकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा: Sunidhi Chauhan: Live कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहान झाली भावुक; पाहा नेमकं काय घडलं

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts