• Home
  • ताज्या बातम्या
  • स्मृती मानधना आणि पलाश लवकरच लग्न मंडपात, पलाश पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर
Top News

स्मृती मानधना आणि पलाश लवकरच लग्न मंडपात, पलाश पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर

Palash, Mandhana wedding

smriti-palash wedding : भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि म्युझिक कम्पोजर पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह पुढे ढकलल्यानंतर पहिल्यांदाच पलाश सार्वजनिक ठिकाणी दिसला असून त्याची बोलकी प्रतिक्रिया समोर आली आहे. सोमवार 1 डिसेंबर रोजी तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यापूर्वी पलाशच्या मानसिक स्थितीबाबत विधान करणाऱ्या त्याची आई अमिता मुच्छल यांनी नुकतेच आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्न लवकरच होऊ शकते. मात्र, विमानतळावर पलाश किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी कोणतीही चर्चा केली नाही.

हेही वाचा – कधी होणार भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे? रोहित-विराट उतरणार मैदानात

23 नोव्हेंबरला स्मृति आणि पलाश यांचे लग्न ठरले होते. पण लग्नाच्या आदल्या दिवशीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्याचा खुलासा झाला आणि लग्न स्थगित करण्यात आले. त्यानंतर पलाशवर काही आरोपही लागले, काही चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. याचदरम्यान पलाश हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याची माहिती समोर आली. आता मात्र तो पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी दिसला असून, त्याची आई दिलेले नवे विधान चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुंबई विमानतळावर पलाशची एन्ट्री

विमानतळावर पलाश नेहमीसारख्या हसऱ्या, उत्साही अंदाजात दिसला नाही. स्मृतीसोबत किंवा मीडियाशी तो नेहमीच मजेत बोलताना दिसत असतो, पण या वेळेस तो गंभीर आणि शांत जाणवत होता. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तो दिसला आणि त्याच्या हातात एक पुस्तक होते. मीडियाला त्याने पाहिले, पण काहीही न बोलता पुढे निघून गेला. त्याच्यासोबत त्याची आई आणि इतर कुटुंबीयही होते.

“लग्न खूप लवकर होईल..” – अमिता मुच्छल

माध्यमांशी बोलताना अमिता मुच्छल म्हणाल्या की, “स्मृती आणि पलाश दोघेही सध्या कठीण काळातून जात आहेत. पलाशने आपल्या पत्नीबरोबर घरी परतण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मीही तिच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. सगळं ठीक होईल.. आणि लग्न खूप लवकर होईल.” विमानतळावर पलाश दिसल्यानंतर त्याच्याकडून मात्र कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts