Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मोरपंखी साडी, गळ्यात मोत्यांची माळ अन् रॉयल लूक; रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात प्रणिती शिंदेंनी वेधलं लक्ष
महाराष्ट्र

मोरपंखी साडी, गळ्यात मोत्यांची माळ अन् रॉयल लूक; रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात प्रणिती शिंदेंनी वेधलं लक्ष

प्रणिती शिंदे Praniti Shinde Look

Revati Sule Wedding Praniti Shinde Look: मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि उद्योगपती अरुण लाखनी यांचे सुपुत्र सारंग लाखनी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्याला राजकारण, उद्योग, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

विवाह सोहळ्यात उपस्थित

विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्याकडे विशेष लक्ष वेधले गेले. राजकीय कार्यक्रमांमध्ये साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रणिती यांचा यावेळी पाहायला मिळालेला पारंपरिक आणि आकर्षक अंदाज अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला.

हेही वाचा: मध्यरात्री ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला कैलास पाटील; बंद दाराआड नेमकं काय चर्चा झाली?

प्रणिती शिंदे यांनी मोरपंखी रंगाची भरजरी काठ, असलेली सुंदर साडी परिधान केली होती. त्यासोबत त्यांनी पारंपरिक दागिन्यांची निवड करत आपला लूक अधिक उठावदार केला होता. गळ्यातील आकर्षक हार, कानातील दागिने आणि सध्या मेकअपने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एका वेगळीच झळाळी दिली. विवाहस्थळी त्यांच्या आगमनानंतर अनेकांच्या नजर त्यांच्यावर खिळल्या होत्या.

प्रणिती शिंदे यांच्या नव्या लूकची जोरदार चर्चा

सोशल मीडियावरही प्रणिती यांच्या या नव्या लूकची जोरदार चर्चा सुरू आहे. विवाह सोहळ्यातील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून, अनेकांनी त्यांच्या पारंपरिक शैलीचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, नेहमी सध्या आणि संयम वेशभूषेत दिसणाऱ्या प्रणिती यांचा हा देखणा अंदाज चाहत्यांना भावला आहे.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळा

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याचीही सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. विविध पक्षांतील नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी एकाच छताखाली आल्याने हा सोहळा विशेष ठरला.

Youtube Channel : youtube.com/channel/UC5tZ7UVY_IuOv88_eQSVMdg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts