Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबई-पुणे महामार्गावर ट्राफिक जाम; वाहनांच्या लांब रांगा, प्रवासाचा संताप
Mumbai

मुंबई-पुणे महामार्गावर ट्राफिक जाम; वाहनांच्या लांब रांगा, प्रवासाचा संताप

Mumbai Pune Traffic Jam: मुंबई-पुणे महामार्गावर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून मुंबईला जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सलग ३ दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढल्याने महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढली आहे.

वीकेंडमुळे पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळ्याकडे रवाना झाले असून, तसेच अनेक प्रवाशी पुण्या मुंबईकडे निघाल्याने पुणे- मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांना तात्पुरता काही मिनिटांसाठी ब्लॉक घ्यावा लागला आहे.

हेही वाचा: बुद्धांचे ‘हे’ विचार देतील मनःशांती; आपल्या प्रियजनांना व्हाट्सअँपवर पाठवा बुद्ध पौर्णिमेनिमित्त खास संदेश!

गर्दी आणि रस्त्याची स्थिती कारणीभूत

महाराष्ट्र दिन आणि सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी फिरला जातात. त्यामुळे महामार्गावर ताण वाढला आहे. त्यातच काही ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि अर्धवट दुरुस्तीमुळे वाहतुकीचा वेग आणखी कमी झाला आहे.

महाराष्ट्र दिन आणि सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी कोकणाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर ताण वाढला आहे. त्यातच काही ठिकाणी सुरू असलेली रस्त्याची कामे आणि अर्धवट दुरुस्तीमुळे वाहतुकीचा वेग आणखी कमी झाला आहे.

याशिवाय काही वाहनचालकांकडून होणारे ओव्हरटेकिंग, नियमभंग आणि बेशिस्त वाहनचालना यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी गर्दीमुळे अडचणी निर्माण होत आहेत.

प्रशासनाचे आवाहन

प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी पुरेसा वेळ ठेवून आणि संयमाने प्रवास करावा, असेही सांगण्यात आले आहे. सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस अशाच प्रकारची वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts