Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर; दुपारी १ वाजता या वेबसाईटवर पाहता येणार
Top News

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर; दुपारी १ वाजता या वेबसाईटवर पाहता येणार

Maharashtra HSC Result 2026: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार असून, अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळपर्यँत फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२) वी परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे २०२६ दुपारी १ वाजता ऑनलाईन प्रसिद्ध केला जाणार आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा पार पडली होती.

हेही वाचा: १ मे रोजीच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन का साजरा केला जातो; यामागे नेमकं कारण काय?

निकाल जाहीर झल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवरून विषयानिहाय गुण पाहता येणार आहेत. तसेच निकालाची प्रिंटआउट घेण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे. याशिवाय DigiLocker अ‍ॅपवर डिजिटल गुणपत्रिका जतन करण्याची सुविधा देखील दिली जाणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनद्वारे एकत्रित निकाल पाहता येईल.

गुणपडताळणी, उत्तरपत्रिका प्रत व पुनर्मूल्यांकन सुविधा

निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया ३ मे २०२६ ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन सुरू राहील. अर्जासाठी शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असेल.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts