Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • अजित पवारांच्या निकटवर्तीय माजी आमदारांचे निधन; आज पहाटे हृदयविकाराचा आला तीव्र झटका
Top News

अजित पवारांच्या निकटवर्तीय माजी आमदारांचे निधन; आज पहाटे हृदयविकाराचा आला तीव्र झटका

MLA Jalna

Suresh Kumar Jethalia:  जालना जिल्ह्यातील राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. परतूरचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी निष्ठा ठेवणारे नेते सुरेशकुमार जेठलिया यांचे पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे परतूर-मंठा परिसरात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक बातमी समोर आली. अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या सुरेशकुमार जेठलिया यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपचारांपूर्वीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा: बुद्धांचे ‘हे’ विचार देतील मनःशांती; आपल्या प्रियजनांना व्हाट्सअँपवर पाठवा बुद्ध पौर्णिमेनिमित्त खास संदेश!

राजकीय प्रवास

सुरेशकुमार जेठलिया यांनी 2009 मध्ये परतूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत नेतृत्व केले. सुरुवातीला काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या जेठलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक कामासाठी ते ओळखले जात होते.

जनतेत लोकप्रिय नेतृत्व

दोन वेळा आमदार राहिलेल्या जेठलिया यांनी आपल्या कार्यकाळात विविध विकासकामांना चालना दिली. त्यांचा जनसंपर्क मजबूत होता आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद ठेवणारे नेते म्हणून त्यांची प्रतिमा होती. त्यामुळेच ते स्थानिक पातळीवर अत्यंत लोकप्रिय ठरले.

त्यांच्या निधनामुळे जालना जिल्ह्यातील राजकारणात एक अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts