• Home
  • महाराष्ट्र
  • SSC HSC Exam Dates: 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; अधिकृत संकेतस्थळांवर लवकरच जाहीर होणार वेळापत्रक
Top News

SSC HSC Exam Dates: 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; अधिकृत संकेतस्थळांवर लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

गिलच्या नेतृत्वात भारतानं जिंकली पहिली मालिका वेस्ट इंडिजचा 2 0 नं सफाया 2

महाराष्ट्रात निवडणुकांची तयारी सुरु असतानाच आता शिक्षण मंडळाने HSC आणि SSC च्या परीक्षा 2 आठवड्यापूर्वीच घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच यंदा निवडणुकांचे आणि परीक्षांचे बिगुल एकत्रच वाजणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन आणि त्यांना ताण येऊ नये यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थी आणि पालकांसाठी ही महत्वपूर्ण बातमी आहे.

एकीकडे निवडणुकांची तयारी सुरु असताना आता दुसरीकडे 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याचा उद्धे यामागे आहे. या निर्णयाचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास या मंडळांना असून फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परिपत्रकानुसार 12 वी HSC बोर्डाची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षा कालावधीत माहिती तंत्रज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा देखील घेण्यात येईल. तसेच 10 वी SSC बोर्डाची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे.

हे हि वाचाEPFO NEW RULE : आता पीएफ मधून काढता येणार 100 टक्के रक्कम; EPFO ची नवीन नियमावली जाहीर

12 वी च्या प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणार आहे. तर 10 वी SSC ची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होईल. हे संपूर्ण वेळापत्रक पुणे, नागपूर, मुंबईसह 9 विभागीय मंडळांसाठी लागू करण्यात आले आहे.

लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार वेळापत्रक

10 वी SSC आणि 12 वी HSC चे संपूर्ण वेळापत्रक लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. अशी माहिती महामंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी सांगितलॆ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts