• Home
  • महाराष्ट्र
  • ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाणेकरांसाठी मेट्रो 4 सुरु होणार,जाणून घ्या कोणकोणते आहे स्थानक
Mumbai

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाणेकरांसाठी मेट्रो 4 सुरु होणार,जाणून घ्या कोणकोणते आहे स्थानक

दांडिया खेळायला जाताय थांबा आधी विश्व हिंदू परिषदेचे नियम पाहा अन्यथा. 5

मुंबईतील ठाणेकरांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. होत असलेली वाहतूक कोंडी पासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक अथक प्रयत्न करता, तर आता ठाणेकरांसाठी खुशखबर असून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी मेट्रो ट्रेन सुरु होणार आहे.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटस्थापनेच्या मुहूर्तावर मेट्रो 4A’ ची ट्रायल रन करण्यात येणार आहे. यंदा सोमवारी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार असून याच दिवशी ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यामुळे ठाणे परिसरातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होण्याची आशा निर्माण होत आहे.

सध्या वडाळा ठाणे कासारवडवली परिसरात मेट्रो ४ चे काम सुरु आहे. हे काम शेवटच्या टप्प्यात असून या मार्गाचे गायमुखपर्यंत (मेट्रो 4A) विस्तारीकरण देखील टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. यासोबतच, 10.5 किमी लांबीचा ‘कॅडबरी जंक्शन ते गायमुख’ हा महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाच्या जवळ असून, ट्रायल रन आणि सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर वर्षाच्या अखेरपर्यंत तो प्रवाशांसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

वाहतूक कोंडी सुटणार

मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वर्षांपासून ठाण्यासाठी मेट्रोची मागणी केली होती. पूर्वीच्या सरकारने ‘ठाण्यात मेट्रो होणार नाही’ असे सांगितले होते, तेव्हा आम्ही ‘पुणे-मुंबई तुपाशी तर ठाणे का उपाशी?’ असा सवाल उपस्थित होत आहे. असे परिवहन मंत्री आणि ठाणे शहरातील आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच आज महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा पाया रचला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावर कळस चढवला. त्यामुळेच आज ठाणेकरांना ही मेट्रो धावताना दिसत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वीस वर्षांपूर्वी आम्ही ठाण्यासाठी मेट्रोची मागणी करत आंदोलन केले होते. त्यावेळी आम्हाला निलंबितही व्हावे लागले होते. त्या आंदोलनामुळेच ही मेट्रो मंजूर झाली आणि आज त्याचे फलित म्हणून ट्रायल रन सुरू होत आहे. यामुळे ठाणेकरांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल. असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

या स्थानकांवर धावणार मेट्रो

ठाणे मेट्रोची 10 स्टेशन निश्चित करण्यात आले आहे. कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावाडी, मानपाडा, टिकूजी – नी -वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन,  कासरवाडावली, गव्हाणपाडा , गायमुख या स्टेशनवर मेट्रो धावणार आहे.

मेट्रो 4 ही 32.32 किमी लांबीची असून, मेट्रो 4A ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर एकूण 32 स्टेशन असून वडाळा ते कासारवडवलीपर्यंतचा विस्तारित मार्ग तीन टप्प्यांत तयार होत आहे, त्यातील सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे.

कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर आणि 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा टप्पा तयार होईल.

यावेळी, कासारवडवली ते गायमुख पर्यंतच्या ग्रीन लाइन 4A विस्ताराचे सुमारे 90 % काम पूर्ण झाले असून, या वर्षाच्या अखेरीस तो सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पहिली मेट्रो या वर्षाच्या शेवटी सुरू होऊ शकते, तर वडाळापर्यंत मेट्रोसाठी ठाणेकरांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts