Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • 90 चे दशक गाजवणारा अभिनेता धर्मेंद्र यांच्याकडे आहे एवढी मालमत्ता; तरीही आहे निसर्गाशी नाळ
मनोरंजन

90 चे दशक गाजवणारा अभिनेता धर्मेंद्र यांच्याकडे आहे एवढी मालमत्ता; तरीही आहे निसर्गाशी नाळ

394

Dharmendra net worth : भारतीय सिनेमाच्या इतिहासात ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र देओल यांनी आज देखील लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत नावाजलेले नाव म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता धर्मेंद्र यांची तब्येत काही दिवसांपूर्वी खालावली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले होते. आता त्यांना डिसचार्ज देण्यात आला असून . धर्मेंद्र देओल लवकरच एका चित्रपटातून झळकणार आहे. त्या चित्रपटाचे नाव होते इक्कीस. हा चित्रपट 25 नोव्हेंबर 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटाचा ट्रेलर देखील नुकताच रिलीज झाला. त्यामध्ये धर्मेंद्रची एक झलक पाहून चाहते तर दिवानेच झाल्याचे पाहायला मिळाले.

धर्मेंद्र यांची कारकीर्द

धर्मेंद्र देओल यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 साली पंजाब येथील संगरूर जिल्ह्यातील नसराली गावात झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी 1960 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळी त्यांनी दिल भी तेरामी भी तेरे या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर फुल और पत्थर, शोले, यादोंकी बारात, सत्यक, चुपके चुपके यासारख्या 276 चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली. त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आणि त्यांना त्यांच्या दमदार कामगिरीमुळे आणि व्यक्तिरेखेमुळे He Man Of Bollywood हि उपाधी मिळाली.

एका छोट्या गावातुन अभिनेता म्हणून नाव कमावलेले धर्मेंद्र आज कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी अभिनयासोबतच व्यवसाय, शेती आणि आत्मिक जीवन या संपूर्ण गोष्टींचा समतोल साधत लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. धर्मेंद्र यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी दोन लग्न केले आहेत. त्यांनी 1959 साली प्रकाश कौर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना एकूण 5 अपत्य आहेत. प्रकाश कौर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले नाही. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हाऊसवाईफ म्हणून घालवले. सनी देओल, बॉबी देओल, इशा देओल, विजेता देओल आणि अजेता देओल हे त्यांच्या मुलांची नावे आहेत. त्यानंतर धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

हे ही वाचा – हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझला मिळाला त्याच्या कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार

निसर्गाशी आहे नाळ

अभिनेता धर्मेंद्र यांना शेतीची प्रचंड आवड आहे. ते अजूनही ग्लॅमरच्या प्रकाशातून दूर जाऊन निसर्गात आपला जास्त वेळ घालवतात. लोणावळ्यात त्यांचे 100 एक्कर फार्महाऊस आहे. या फार्महाऊस मध्ये ते स्वतः शेती करतात. त्याठिकाणी ते झाडे लावणे, जनावरांची देखभाल करणे, शेतीच्या कामात हातभार लावणे यासारख्या कामात मनमवतात.

एवढी आहे मालमत्ता

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता धर्मेंद्र यांची एकूण नेटवर्थ सुमारे 335 कोटी ते 450 कोटी एवढी आहे. त्यांची मुंबई आणि पंजाब मध्ये मालमत्ता आहे. एवढेच नाही तर त्यांच्या मालकीचे बरेच जुने फ्लॅट्स आणि IMPALA मॉडेल्स त्यांचं गॅरेज मध्ये ठेवण्यात आले आहे. ते एवढ्या मोठ्या संपत्तीचे मालक असूनही अतिशय साधेपणाने राहतात. त्यांचा Garam Dharam Dhaba या थीम वर एक रेस्ट्रॉरंट आहे. हे रेस्ट्रॉरंट उत्तर भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. या व्यवसायातून त्यांना दरवर्षी कोट्यवधींचा फायदा होतो.

अभिनेता धर्मेंद्र यांनी त्यांच्या मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 88 लाख रुपये आणि 52 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या कृषी आणि बिगर कृषी जमिनींमधेय त्यांनी गुंतवणूक केली आहे. धर्मेंद्र यांचा प्रवास हा फॅक्ट चित्रपट सृष्टीतील एक यशोगाथा नसून एक प्रेरणा देणारी जीवनगाथा आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी अशा त्यांच्या चाहत्यांकडून समाज माध्यमांच्या आधारे करण्यात येत आहे. (Dharmendra net worth)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts