Sherlyn Chopra Breast Implant Removal : मनोरंजन क्षेत्रात अभिनेता अभिनेत्री कोणत्या कारणाने चर्चेत येतील सांगता येत नाही. आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिने घेतलेल्या एका मोठा निर्णयामुळे चर्चेत आली आहे. तिने काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट इम्प्लांट्स केले होते. आता तिने ते पूर्णपणे काढून टाकले असल्याची माहिती समोर अली आहे. याबाबत तिने नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांसोबत माहिती शेअर केली आहे. तिच्या चाहत्यांना हे ऐकून मोठा धक्का बसला आहे.
शर्लिन चोप्राने समाज माध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितले आहे कि, बऱ्याच दिवसांपासून तिला शरीराच्या विविध भागांमध्ये असह्य वेदना जाणवत होत्या. त्यामुळे जेव्हा वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा समजले की या वेदनांचे मूळ कारण आहे ते म्हणजे त्यांच्या शरीरात बसवलेले ब्रेस्ट इम्प्लांट्स. या ब्रेस्ट इम्प्लांट्समुळे होणारा त्रास आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन, शर्लिन चोप्राने तात्काळ हे इम्प्लांट्स काढण्याचा निर्णय घेतला. यामुळे सध्या समाज माध्यमांवर तिचे भारब्वहरुंज कौतुक केले जात आहे.
या अभिनेत्रीने यापूर्वी देखील असाच निर्णय घेतला होता. तिने 2023 या वर्षी चेहऱ्यावरील सर्व फिलर्स (Fillers) काढून टाकले होते. ज्यामुळे शर्लिन आपल्या मूळ आणि नैसर्गिक रूपात दिसू लागली होती. त्यानंतर ती नैसर्गिक सौन्दर्याला प्राधान्य देत असल्याचे समोर आले होते.
View this post on Instagram
ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरीपूर्वी भावना व्यक्त
तिने ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरीपूर्वी समाज माध्यमांवर तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तेव्हा ती म्हणाली होती कि, “मी थोडी घाबरली आहे का? हो, थोडीशी. पण उत्साहित आहे. कोणत्याही ओझ्याशिवाय एक अगदी नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी मी आतुर आहे. आज माझी ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांना आणि मला देवाने आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करते.’ हि सर्जरी यशस्वी झाल्यानंतर तिने पुन्हा समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांना हलकं वाटत असल्याचे सांगितले होते.
या अभिनेत्रीने केले आहे ब्रेस्ट इंप्लांट (Sherlyn Chopra Breast Implant Removal)
द टाइम्स ऑफ इंडिया कडून मिळालेल्या माहितीनुसार एलिसा मिलानो आणि एशली टिस्देल या गोंहोई अभिनेत्रींनी यापूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी केली होती. याशिवाय बॉलिवूड मध्ये आयेशा टाकिया, बिपाशा बासू, सुश्मिता सेन, कंगना राणावत या अभिनेत्रींनी ब्रेस इंप्लांट केले आहे. परंतु बॉलिवूड मध्ये ब्रेस्ट इंप्लांट रिमूव्हल सर्जरी कोणीही केलेली नाही. म्हणजे शर्लिन चोप्रा हि पहिली अभिनेत्री आहे जिने ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी केली आहे.












