BJP–Shinde Mumbai seat-sharing formula : मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिंदे गटाचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, जगांचा फाॅर्म्युला ठरला ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून रंगणार ड्रामा रात्री उशीरा संपला असून दोन्ही पक्षातील नेत्यांची जागावाटपाची माहिती माध्यमांनी दिली. शिंदे गट आणि भाजप मध्ये जपळपास २०७ जागांवर एकमत झालं होतं. मात्र, उर्वरित २० जागंसाठी दोन्ही पक्ष माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांची जपळपास ५ तास हाय व्होल्टेज बैठक पार पडली अन् अखेर यामध्ये तोडगा निघाला. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी भाजप १३७ जागा लढणार असून शिंदे गटाच्या वाट्याला ९० जागा आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या बरोबर एक दिवस आधी हा तिढा सोडवण्यात आला आहे.
हेही वाजा – शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळला! कल्याणमध्ये पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू
शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी एकत्रित येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी महायुतीच्या फॉर्म्युलाबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबई महापालिकेच एकूण २२७ जागा आहेत. यापैकी ९० जागांवर शिवसेना लढणार असल्याचं ठरलं आहे. तर भाजपच्या वाटेला १३७ जागा आल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. भाजप आपल्या वाट्यातील जागांमधून मित्रपक्ष असलेल्या रिपाई पक्षाला देणार असल्याचं देखील अमित साटम यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून 137 जागा भाजपा तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची… pic.twitter.com/uetqMGhBt5— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 29, 2025
१३७ जागा भाजपा तर ९० जागा शिवसेना लढवणार
भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून १३७ जागा भाजपा तर ९० जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची
गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा आहे. ही निवडणूक भाजप, शिवसेना, ठाकरे गट, मनसे या पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ठाकरेंकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजकीय युती झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंसाठी राजकीय अस्तित्वाची निवडणूक असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे भाजप उद्धव ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी भाजपला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मदत होणार आहे.












