• Home
  • राजकारण
  • पुण्यात भाजप आणि शिंदेसेनेची युती फिस्कटली; शिंदेसेना पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढणार
Top News

पुण्यात भाजप आणि शिंदेसेनेची युती फिस्कटली; शिंदेसेना पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढणार

BJP and Shinde Sena leaders after alliance collapse in Pune

BJP Shinde Sena alliance breaks in Pune : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना एकत्रित महानगरपालिका निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती. बैठका, जागावाटप आणि उमेदवार संदर्भात भाजप आणि शिवसेनेत बैठका देखील पार पडल्या होत्या, मात्र युतीमध्ये अपेक्षित जागा न मिळाल्याने पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे.

१६ जागा देऊ केल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय

पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेची युती होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेंची शिवसेना पुण्यात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे. भाजपने फक्त १६ जागा देऊ केल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेना (Shivsena) नेते नाना भानगिरे यांनी सांगितलं आहे. जागावाटपाच्या निर्णयाबाबत आज पुण्यात शिवसेनेची बैठक पार पडणार होती, या बैठकीसाठी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत पुण्यात येणार होते, मात्र उदय सामंत पुण्यात येण्याअगोदरच शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांची बाजू घेतली.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात महायुती फिस्कटली; भाजप शिंदेसेना स्वतंत्र लढणार

पुण्यात शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर

शिवसेनेने 165 जागा लढणार असल्याचं सांगितलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचं सांगत युतीत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. एबी फॉर्म देण्यासाठी शहराध्यक्ष आणि उपनेते हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. पुण्यात शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर झालं आहे. शिवसेना १६५ जागा लढवणार आहे, सर्वांना एबी फॉर्म दिले जातील, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts