• Home
  • राजकारण
  • पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर
Pune

पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Gaja Marne Wife Candidacy

Gaja Marne’s wife NCP candidacy Pune : राज्यात सध्या महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पालिका उमेदवारीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, पुण्यातून मोठी बातमी समोर आलीय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केल्याचे समोर आले आहे. गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. दुसऱ्या बाजूला आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर हा देखील निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – पुण्यात भाजप आणि शिंदेसेनेची युती फिस्कटली; शिंदेसेना पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढणार

गजा मारणे टोळीविरोधात मुरलीधर मोहोळ स्वत: मैदानात

काही दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात गजा मारणे तुरूंगात आहे. मारहाण झालेली व्यक्ती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये काम पाहात होता. त्यामुळे हे प्रकरण शहरात खुप चर्चेत आलं होतं. गजा मारणे याच्या टोळीकडून या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणारे आरोपी जामीनावर सुटल्याची माहिती होते, त्यानंतर गजा मारणे टोळीविरोधात मुरलीधर मोहोळ स्वत: मैदानात उतरले आणि आरोपींसह टोळीचा प्रमुख गजा मारणे याला देखील अटक करण्यात आली.

गजा मारणे टोळी अडचणीत

मुरलीधर मोहोळ याच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्यानंतर गजा मारणे याची टोळी चांगलीच अडचणीत आली. या प्रकरणामुळे टोळीचा मोरक्या खुद्द गजा मारणेला तुरूंगात जावे लागले. आता त्याची पत्नी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने पुन्हा एकदा गजा मारणे चर्चेत आलाय. तर तिकडे रुपाली ठोंबरे पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 2 प्रभागातून उमेदवारी देण्यात आली. कसब्यातून प्रभात 25 अ शनिवार पेठ मंडई व प्रभाग 26 ब गुरूवार पेठ घोरपडी पेठ समता भूमी या 2 ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन एबी फॉर्म

रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन एबी फॉर्म दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटील आणि रूपाची चाकणकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करताना रूपाली पाटील दिसल्या. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट देखील या वादादरम्यान घेतली होती. आता रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन एबी फॉर्म पक्षाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts