Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अजितदादा यांच्या कार्याचे महत्त्वाचे १० प्रमुख पैलू
Top News

अजितदादा यांच्या कार्याचे महत्त्वाचे १० प्रमुख पैलू

Ajit Pawar major works

Ajit Pawar major works : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत धडाडीचे नेते, कडक शिस्तीचे प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची ओळख होती. ते बारामतीचे सातवेळा आमदार, दीर्घकाळ उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर स्वतंत्र वाट चोखाळणारे नेते म्हणून ओळखले जात होते, ज्यांनी पहाटेच्या शपथेपासून ते थेट भाजपसोबतच्या युतीपर्यंतचे धाडसी निर्णय घेतले. २८ जानेवारी २०२६ पर्यंतचे अजितदादा पवार यांच्या कार्याचे १० प्रमुख पैलू याविषयी थोडक्यात माहिती घेऊया..

अजितदादा यांच्या कार्याचे १० प्रमुख पैलू

दीर्घकाळ उपमुख्यमंत्री – महाराष्ट्राचे विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांनी काम केले आहे.

बारामतीचे नेतृत्त्व – १९९१ पासून सातत्याने बारामती विधानसभा मतदारसंघ जिंकून अभेद्य वर्चस्व राखले.

अर्थसंकल्पाचा अभ्यास – अर्थमंत्री म्हणून अनेक वर्षे राज्याचा अर्थसंकल्प मांडून राज्याच्या आर्थिक नीतीवर पकड ठेवली.

कडक प्रशासक – वेळेचे पालन आणि कामाचा त्वरित निपटारा करण्यामुळे ‘कडक प्रशासक’ अशी अजितदादा यांची प्रतिमा होती.

एनसीपीमध्ये फूट – २०२३ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत स्वतंत्र गट स्थापन केला आणि भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले.

सहकारी क्षेत्रातील अनुभव – दूध संघ, सहकारी बँका (पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक – १६ वर्षे अध्यक्ष) आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून गावगाड्यावर अजितदादांची पकड होती.

विकासकामे – अजित दादांकडे पाटबंधारे आणि ऊर्जा मंत्रीपद असताना त्यांच्या कार्यकाळात राज्यात पायाभूत सुविधांचा विकास झाला.

जनता संवाद – अजितदादांनी ‘जनता दरबार’च्या माध्यमातून नागरिक आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून समस्या सोडवण्यावर भर दिला.

धाडसी राजकारण – २०१९ च्या पहाटेच्या शपथेपासून ते थेट सत्तेत सामील होण्यापर्यंतच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक अनपेक्षित राजकीय निर्णय घेतले आहेत.

कार्यकर्ता संवाद – कार्यकर्त्यांना वेळेचे महत्त्व आणि कामाची पद्धत शिकवणारे, स्पष्टवक्ते म्हणून देखील अजितदादा यांची ओळख आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts