Ambedkar memorial inauguration 2026 : आज 6 डिसेंबर म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने मुंबई येथे चैत्यभूमीवर अफाट गर्दी बघायला मिळत आहे. अनेक शहरातून अनेक लोक या दिवशी मुंबई येथील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी येतात. आज या दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना आदरांजली वाहिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याबाबत माहिती दिली.याशिवाय त्यांनी किती टक्के काम पूर्ण झाले आहे याबाबत देखील सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे 50 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडणार आहे. पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Babasaheb Ambedkar) स्मारकाचे आपण लोकार्पण करु, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यावेळी मुंबईतील चैत्यभूमी येथे अफाट गर्दी बघायला मिळाली. सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आदरांजली वाहिली.
पुढच्या वर्षी होणार लोकार्पण
पुतळा संघर्ष समितीने मागणी केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच समन्वय समिती स्थापन केली होती. पुढील वर्षी पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन असणार आहे. त्यानंतर जर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न आल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण करण्यात येऊ शकते असे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे.
Offered my humble tributes to MahaManav BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar ji on #MahaParinirvanDin at Vidhan Bhavan, Mumbai.
Legislative Assembly Speaker, Legislative Council Chairman and my colleagues joined too. pic.twitter.com/1ZLwp03ERt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 6, 2019
50 टक्के काम पूर्ण
या स्मारकाचा पायथा 100 फूट तर स्मारक 350 फूट उंच असणारा आहे. हे स्मारक एकंदरीत भव्य असेल. या स्मारकाचे प्रवेश द्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर अंतर्गत सजावटीचे काम सुरु आहे. तर बाह्ये विकारसकामे प्रगतीपथावर आहे. सध्या पुतळयाचे पॅनल कास्टिंगचे काम पूर्ण झाले असून शंभर फूट उंचीच्या चौथऱ्यावर 350 फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला हा पुतळा उभारला जाणार आहे. सध्या या पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू आहे. या फॅब्रिकेशन मध्ये आणखी 1400 टन पोलादची आवश्यकता असून 650 टन फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.
हे ही वाचा : इंडिगो संकट: आजही 300 हून अधिक उड्डाणं रद्द; दिल्ली-बेंगळुरु विमानाचं तिकिट 50 हजारांवर, प्रवाशांचे प्रचंड हाल
आपल्या देशात समाजात एक प्रचंड मोठी विषमता निर्माण झाली होती. मानव म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला होता. या विषमतेला आपली शक्ती बनवून बाबासाहेबांनी ज्ञान संपादन केले आणि समाज जागृत केला आणि भारताला संविधान दिले. देश यामुळे प्रगती करू शकला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत आदरांजली वाहिली. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा देखील भाषणात उल्लेख केला. पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात कोणत्याही ग्रंथापेक्षा संविधान सर्वोत्तम आहे. भारताचे संविधान हे जगातले सर्वोत्तम संविधान आहे. भारताचे संविधान हे जगातले सर्वोत्तम संविधान आहे. प्रत्येक उत्तर या संविधानात सापडते.












