Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महायुतीमध्ये फूट! भिवंडीत भाजपा पाठोपाठ शिवसेना महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार…
Top News

महायुतीमध्ये फूट! भिवंडीत भाजपा पाठोपाठ शिवसेना महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार…

Bhiwandi Mayoral Election : भिवंडी महापालिका निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे व तब्बल एक महिन्यानंतर ही कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराकडून संख्याबळाचे गणित जुळून येण्यात अपयश आल्यामुळे भाजपा व शिवसेना या महायुतीतील दोन पक्षात फूट पडली असल्याचे समोर येत आहे.  आज सोमवार 16 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महायुतीतील भाजपा पाठोपाठ शिवसेनेने सुद्धा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना पक्षनेते प्रकाश पाटील यांनी शिवसेना प्रमुख पदाधिकारी व ज्येष्ठ नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केले आहे. घोषणेनंतर भिवंडी पालिकेतील सत्तेची समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता असून त्यामध्ये कोण यशस्वी होतो हे 20 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार एवढे नक्की.

हेही वाचा – ‘मला आजमवायचं असेल, तर 2029 ला कल्याण लोकसभेत या;’ श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईक खुलं आव्हान

भिवंडी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजपा व शिवसेनेने महायुती म्हणून लढवली होती.यामध्ये भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 असे एकत्र महायुती म्हणून 34 सदस्य निवडून आले होते.परंतु बहुमतासाठीचा 46 ही संख्या जमवण्यात भाजपाला अपयश येत असतानाच शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या सोबतीने महापौर पदासाठी जुळवाजुळव सुरू केली.त्याच दरम्यान विलास पाटील यांना आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याने भाजपा व शिवसेना यांच्यातील वितुष्ट समोर आले.त्यानंतर भाजपाने महापौर पदासाठीची निवडणूक लढवत असल्याचे घोषित केले.त्या पाठोपाठ शिवसेना पक्षाने सुद्धा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले आहे.

भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने अनेकांकडून सत्ता स्थापने साठी प्रयत्न सुरू आहेत.शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने भिवंडी पालिका महापौर व उपमहापौर पदासाठीच्या दोन्ही निवडणुका शिवसेना लढवत आहे.शिवसेना पक्षाचा हा निर्णय भाजपला कळवण्यात आला आहे.प्रयत्न तर दोघांकडून सुरू होते.अंतिम निर्णय होऊ न शकल्याने भाजपा त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवेल तर शिवसेना आपल्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहे.आमच्या सोबत विलास पाटील आले असताना त्यांना अटक झाली.त्यानंतर ही पक्षाने भूमिका ठाम ठेवली असून उमेदवार कोण असेल हे उद्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कडून ज्यांचे नाव येईल ते उमेदवार असतील अशी माहिती पक्षनेते प्रकाश पाटील यांनी दिली.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts