Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुनगंटीवार विरूद्ध जोरगेवार वर्चस्वाची लढई! चंद्रपूरात महापौरांच्या पदभार सोहळ्याला १६ नगरसेवक गैरहजर
Top News

मुनगंटीवार विरूद्ध जोरगेवार वर्चस्वाची लढई! चंद्रपूरात महापौरांच्या पदभार सोहळ्याला १६ नगरसेवक गैरहजर

Internal dispute in Chandrapur BJP

Chandrapur Mayor Charge Ceremony Absence : चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur municipal politics) सत्ता स्थापन केल्यानंतर महापौर पदभार सोहळ्याचा (charge-taking ceremony) दिवस भाजपसाठी उत्सवाचा होता. नवनियुक्त महापौर (Chandrapur mayor Sangeeta Khandekar) संगीता खांडेकर यांनी ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारला. ढोल ताशे वाजले, फटाके फुटले, पण या जल्लोषाच्या आवाजात नाराजीचा एक सुप्त सूरही उमटत होता. विजयाचा हा गुलाल सुकण्यापूर्वीच चंद्रपूर भाजपमधील (Maharashtra local politics) अंतर्गत गटबाजीने राजकारण तापवलं आहे. कारण या सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक (Kishor Zorgewar supporters) १६ नगरसेवक गैरहजर (16 corporators absent) असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – अजितदादांचे विश्वासू प्रमोद हिंदूराव मोठं वक्तव्य; “अजितदादा प्लेनने नाही, बायरोड जाणार होते”

विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. निमित्त ठरलं ते आमदार किशोर जोरगेवारांची अनुपस्थिती. धक्कादायक बाब म्हणजे, खुद्द स्थानिक आमदारांनाच या अधिकृत कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याचा आरोप जोरगेवार गटाने केला आहे. हा केवळ आमदारांचा अपमान नसून तो कार्यकर्त्यांचा अवमान असल्याची भावना जोरगेवार समर्थकांनी व्यक्त केली आहे.

या अपमानाचा निषेध म्हणून जोरगेवार समर्थक असलेल्या तब्बल १६ नगरसेवकांनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. महापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला पक्षाचेच १६ नगरसेवक गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वरवर सर्व काही आलबेल दिसत असले, तरी चंद्रपूर भाजपमध्ये दोन गट पडल्याचे आता स्पष्ट झालं आहे.

एकीकडे मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापनेचा आनंद साजरा होत असताना, दुसरीकडे जोरगेवार गटाची ही उघड नाराजी भविष्यात महापालिकेच्या कामकाजावर काय परिणाम करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. केवळ एका मताने निवडून आलेल्या महापौरांना आपल्याच पक्षातील १६ नगरसेवकांचा पाठिंबा टिकवून ठेवणं, हे मोठं आव्हान असणार आहे.

हा अंतर्गत कलह पक्षश्रेष्ठी कसा मिटवणार? की आगामी काळात ही दरी अधिक रुंदावणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपने काँग्रेसला धक्का तर दिला, पण आता स्वपक्षाची नाराजी दूर करताना भाजपची मोठी दमछाक होणार, हे आजच्या चित्रावरून स्पष्ट झालंय.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts