Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • ‘मला आजमवायचं असेल, तर 2029 ला कल्याण लोकसभेत या;’ श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईक खुलं आव्हान
Top News

‘मला आजमवायचं असेल, तर 2029 ला कल्याण लोकसभेत या;’ श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईक खुलं आव्हान

Shrikant Shinde's challenge to Ganesh Naik
85

Shrikant Shinde’s challenge to Ganesh Naik : कल्याण लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. उपमुख्यमंत्री यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत खरपूस समाचार घेतला आहे. डोंबिवलीत महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट आव्हान दिलं. ‘जर तुम्हाला मला आजमवायचं असेल, तर 2029 मध्ये कल्याण लोकसभेत या,’ असं थेट आव्हानच श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईक दिलं आहे. त्यामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणूकीला जवळपास ३ वर्ष बाकी असतानाच आव्हान-प्रतिआव्हान देऊन वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

हेही वाचा – आरक्षित भूखंड विक्री वरून गणेश नाईक आक्रमक, एकनाथ शिंदेवर थेट हल्लाबोल

महाशिवरात्रीनिमित्त डोंबिवलीतील मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिर आणि पिंपळेश्वर मंदिर येथे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीकेची झोड उठवली. “वयानुसार काही आजार होत असतात, त्यामुळे त्यांना काही आजार झाले असतील. तो आजार आमच्या बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात बरा होऊ शकतो, असा टोला त्यांनी लगावला.

तसंच, तुमच्या पक्षातील मंदा म्हात्रे यांनीच तुम्हाला माजी करण्याचं काम केलं होतं, असा घणाघात करत त्यांनी राजकीय परिस्थितीची आठवण करून दिली.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शत-प्रतिशत शिवसेनेची सत्ता असल्याचा दावा करत, मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, बहुत लोग आये, बहुत लोग गये, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या या विधानांमुळे कल्याणमधील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. 2029 च्या निवडणुकीचा उल्लेख करत दिलेल्या या आव्हानानंतर आता गणेश नाईक काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts