Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बृहन्‍मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी 2 हजार 231 नामनिर्देशनपत्र वैध, तर 167 नामनिर्देशन अवैध
Mumbai

बृहन्‍मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी 2 हजार 231 नामनिर्देशनपत्र वैध, तर 167 नामनिर्देशन अवैध

Officials scrutinising nomination forms for BMC elections

BMC election nomination scrutiny : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्राप्‍त 2 हजार 516 नामनिर्देशनपत्रांची आज छाननी करण्‍यात आली. यापैकी 167 नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली तर उर्वरित 2 हजार 231 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून वैध उमेदवारांना निवडणूक चिन्‍हांचे वाटप करण्‍यात येणार आहे.

नामनिर्देशनपत्रांची छाननी

राज्‍य निवडणूक आयोगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या २२७ नगरसदस्य निवडणुकीसाठी 23 डिसेंबर 2025 पासून नामनिर्देशनपत्र सादर करण्‍यास सुरुवात झाली होती. तर 30 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 11 हजार 391 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्‍यात आले होते. आणि 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून सर्व 23 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयांमध्‍ये नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया राबविण्‍यात आली. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे, ना-हरकत प्रमाणपत्रे, अर्जाचे सर्व रकाने नीट भरले आहेत की नाही यासह विविध बाबींची तपासणी करण्यात आली. ज्यांचे अर्ज परिपूर्ण आहेत, त्यांचे अर्ज वैध ठरवून अंतिम करण्यात आले. त्यानुसार, २ हजार २३१ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर १६७ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली.

मेदवारांची अंतिम यादी शनिवारी होणार जाहीर

छाननी प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. आता, उमेदवारी मागे घेण्याची मुदत शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेदरम्यान आहे. तर, शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्‍ह नेमून देण्‍यात येणार आहे. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.

अवैध नामनिर्देशन पत्र संख्‍या

१) ए + बी + ई विभाग (RO २३) – १४८ / २

२) सी + डी विभाग (RO २२) – ४९ / ०३

3) एफ दक्षिण विभाग (RO २१) – ७१ / ०२

४) जी दक्षिण विभाग (RO २०) – ६५ / ०८

५) जी उत्‍तर विभाग (RO १९) – १२७ / ०४

६) एफ उत्‍तर विभाग (RO १८) – ११८ / ००

७) एल विभाग (RO १७) – ९६ / ०८

८) एल विभाग (RO १६) – १०७ / ०४

९) एम पूर्व विभाग (RO १५) – १६२ / १२

हे ही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा

१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) -१४१ / २३

११) एन विभाग (RO १३) – १२२ / ०१

१२) एस विभाग (RO १२) – ८५ / ३४

१३) टी विभाग (RO ११) – १०३/ ०६

१४) एच पूर्व विभाग (RO १०) – ११२/०२

१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) – ७०/०२

१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) – १०० / ०१

१७) के पश्चिम विभाग (RO ७) – १२२ / ११

१८) पी दक्षिण विभाग (RO ६) – ७० / ०६

१९) पी पूर्व विभाग (RO ५) – १०५/१२

२०) पी उत्‍तर विभाग (RO ४) – ७१/०२

२१) आर दक्षिण विभाग (RO ३) – ९३/१६

२२) आर मध्‍य विभाग (RO २) – ४२/०३

२३) आर उत्‍तर विभाग (RO १) – ५२ / ०५

एकूण – २,२३१/१६७

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts