Dilip Mane and Pragya Satav join BJP : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. तर काही पदाधिकार्यांची खांदेपालट करत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. अशी सर्व निवडणूकीची प्रक्रिया सुरू असताना सोलापूर मध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. माजी आमदार दिलीप माने यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा सोलापूर महापालिकेच्या दृष्टीने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजपसाठी ताकत वाढली आहे. तर तिकडे माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी देखील त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या काळात काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेताना दिसत नाही.
फडणवीसांची मोठी खेळी, थेट राज्यपालांकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी
सोलापूर जिल्हा हा काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसला आहे. सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांच्या शहरात मोठी ताकत आहेत. आगामी महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. अशा परिस्थितीत हा पक्षप्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला आहे. तर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दिलीप माने यांच्यासह ३ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
दक्षिण सोलापुरचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक जयकुमार माने, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, माजी नगरसेवक दादाराव ताकमोगे, सोलापूर बाजार समितीचे प्रथमेश पाटील, माने सहकारी बँकेचे संचालक आनंद देटे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष पृथ्वीराज माने, साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय भोसले, नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.सतीश दरेकर, सोलापुरचे उद्योजक श्रीकांत मेलगे-पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
दक्षिण सोलापुरचे माजी आमदार दिलीप माने यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपा परिवारात प्रवेश!
📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर-
सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जयकुमार माने, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, माजी नगरसेवक दादाराव ताकमोगे, सोलापूर… pic.twitter.com/4NvbT7Ajs1— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 18, 2025
भाजपची ताकद वाढली, तर काँग्रेसला हादरा बसला
माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाने आगामी सोलापूर महापालिकेसाठी भाजपची ताकद आणखीन वाढली आहे. तर काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. याचा परिणाम थेट आगामी महानगरपालिकेवर होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही काळापासून रंगली होती. माने यांनी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे माने यांचा पक्षप्रवेश काही काळ लांबला होता. मात्र आता त्यांनी अनेक माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी आमदार प्रज्ञाताई सातव यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश!
📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर-
काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव मस्के, जिल्हा… pic.twitter.com/nRi65Al88q— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 18, 2025
प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव मस्के, जिल्हा प्रवक्ता तथा उपाध्यक्ष विलास गोरे, कळमनुरीचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा औंढा नागनाथचे तालुकाध्यक्ष पंकज जाधव, खेर्डा गावचे सरपंच पंजाबराव गडदे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव चव्हाण यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश केला आहे, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात देखील काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.












