• Home
  • राजकारण
  • फडणवीसांची मोठी खेळी, थेट राज्यपालांकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी
Top News

फडणवीसांची मोठी खेळी, थेट राज्यपालांकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी

Manikrao Kokate

Fadnavis demands Kokate resignation : मागील दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार, ते राजीनामा देणार अशा चर्चा रंगत होत्या. त्यापैकी एक गोष्ट खरी झाली, माणिकराव कोकाटे यांचे मंत्री पद गेला, पण त्यांनी राजीनामी दिला नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी थेट राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. म्हणजे त्यांचे मंत्रीपद हे काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा चेंडू सध्या राज्यपालांच्या कोर्टात असल्याचं सांगितलं जातंय. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात कोकाटे यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. यामुळे कोणत्याही क्षणी त्यांची अटक होऊ शकते. कोकाटे मुंबईतील रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर ते राजीनामा कधी देणार यावरून चर्चा रंगताना दिसल्या. मात्र, आता या सर्व चर्चेंना काही दिवस का होईना पूर्णविराम मिळणार आहे.

हेही वाचा – सातारा ड्रग्स प्रकरण! सुषमा अंधारे यांचे थेट एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप

सुरूवातीला सांगण्यात आले की, माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिला. मात्र, त्यानंतर परत अशी चर्चा सुरू झाली की, माणिकराव कोकाटे यांनी कोणत्याही प्रकारचा राजीनामा दिला नाही. आता संभ्रम दूर झाला असून माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले. सदनिका घोटाळा प्रकरण माणिकराव कोकाटे यांच्या चांगलेच अंगलट आले. कोर्टाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

कोकाटे आपल्या पदावरून पायउतार

माणिकराव कोकाटे यांचे खाते काढण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली. आता कोकाटे आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत. रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. काही दिवस त्यांच्याकडे हे मंत्रिपद असणार आहे.

पदाचाच कारभार काढून काही होणार नाही

फक्त पदाचाच कारभार काढून काही होणार नाही तर मंत्रिपदाचाही कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत होती. काही दिवसांपूर्वीही माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्यांचे खाते बदल करून मंत्रीपद वाचवण्यात आले होते. मात्र, आता शेवटी अजित पवार यांनी कारवाई केली आहे. माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts