Sharad Pawar Sunetra Pawar Deputy CM oath : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निधन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या शपथविधी बाबत आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी मुंबईहून बारामती जात असताना अपघात झाला. यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी मागणी जोर धरत होती. त्यासंदर्भात अनेक घडामोडी देखील आल्यात. आज सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. परंतु याबाबत सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नसल्याची आणि न सांगता मुंबईला गेल्याची माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवार मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल
पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे आणि याकरिता भाजपा देखील सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या निधनाला काही तास झालेले असतानाच उपमुख्यमंत्रीपदावरून हालचाली वाढताना दिसत आहेत. रात्री उशीरा मुलगा पार्थ पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या.
हे ही वाचा : महाराष्ट्राच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार घेणार आज शपथ; 5 वाजेदरम्यान होणार शपथविधी
शपथविधी आज आहे याचीही कल्पना नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधत सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. तसेच शपथविधी आज आहे याचीही त्यांना कल्पना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा रंगली होती. परंतु यात आता खंड
प्रफुल पटेल, तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते असून तो त्यांचा अधिकार आहे. अजित पवार यांचे निधन हा राजयसाठी मोठा आघात असून NCP राष्ट्रवादीने काय करावं हे त्या पक्षातील नेत्यांनी ठरवावे. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. याबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती. विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा रंगली होती. परंतु यात आता खंड पडला आहे. असं देखील शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा नाही
अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र दिसले होते. परंतु शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता मुलगा पार्थ पवार सह सुनेत्रा पवार रात्री उशिरा मुंबईत पोहोचल्या होत्या. याववत शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नाही. याबाबत स्वतः शरद पवार यांनी माहिती दिली.












