• Home
  • राजकारण
  • राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ! शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीला बहिष्कार?
Top News

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ! शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीला बहिष्कार?

website 91

Shinde group boycotts the meeting  : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे लक्षात भाजप पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यानंतर आता सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याची माहिती समोर आलं आहे. याच अंतर्गत नाराजीमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकल्याचे समजते.

आज राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट बैठक होते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला यापैकी एकही मंत्री गेला नाही. केवळ एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेच्या उर्वरित मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचले. या दालनात सध्या देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा सुरू आहे, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. 

हेही वाचा – अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश!राजकीय दबावाचा बळी की राजकारणाची नवी खेळी?

शिंदे गटांच्या नगरसेवकांना भाजपने गळाला लागले

शिंदे गटाच्या या नाराजीचे कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेली फोडाफोडी कारणीभूत असल्याचे समजते. आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जातीने उपस्थित होते. भाजपने कालपासून ही बातमी गुप्त ठेवत श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या नगरसेवकांना गळाला लावले होते. याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून गळाला लावले जात आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री प्रचंड नाराज असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शिंदे गट प्रचंड नाराज ?

ठाणे, पालघर, कल्याण भागातील शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणार्‍या ठाण्यात जनता दरबार घेण्याचा सपाटा लावला आहे. तर रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना गळाला लावून मानाने भाजपमध्ये प्रवेश दिला होता. या सगळ्या घडामोडींवर शिंदे गट प्रचंड नाराज असल्याचे समजते.

शिवसेना मंत्र्यांची नाराजीची कारणे

१. भाजप सेनेचे नेते ,नगरसेवक व पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेत आहेत.

२. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवारांना भाजप आपल्या पक्षात घेत आहे.

३. शिंदेच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात किंवा निधी वळवला जातो.

४. आगामी निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही.

५.  निधी मिळवण्यासाठी शिंदेच्या मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

६. संभाजी नगर ,कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने असे प्रवेश करून घेतलेत ,किंवा युतीचा धर्म पाळला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts