Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सुनेत्रा पवार यांचा मुंबईत शपथविधी, सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना
Top News

सुनेत्रा पवार यांचा मुंबईत शपथविधी, सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना

Sunetra Pawar oath ceremony Mumbai

Sunetra Pawar oath ceremony Mumbai : अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अशातच आज मुंबईत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर त्याचवेळी खासदार खासदार सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आलीय. आज दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. मुंबईत शपथविधीची तयारी सुरू असताना बारामतीतही हालचालींना वेग आल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा – सुमेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवारांचा मुंबईत शपथविधी, सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार काल रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्या होत्या. यानंतर आज दुपारी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. मुंबईत ही सर्व प्रक्रिया सुरु असताना सुप्रिया सुळे या बारामतीतील अजित पवारांच्या घरी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताईंची भेट घेतली. आशाताईंची विचारपूस केल्यानंतर त्या तातडीने दिल्लीला जाण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.

शपथविधीबाबत मला काहीही माहिती नाही – सुप्रिया सुळे

पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उद्या देशाचं बजेट आहे, मी राष्ट्रवादीची फ्लोअर लीडर आहे, त्यामुळे मला जावं लागत आहे. मी आशा काकींना भेटण्यासाठी आले होते. आता मी गाडीने पुण्याला जात आहे, तिथून विमानाने दिल्लीला जाणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी, मला याबाबत काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावरही त्यांनी मला काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला होता.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts