Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • बिहारमध्ये दसवी बार नितीश कुमार! मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरला; कधी होणार शपथविधी?
Top News

बिहारमध्ये दसवी बार नितीश कुमार! मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरला; कधी होणार शपथविधी?

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. एनडीए आघाडीनं निवडणुकीत बहुमत मिळवलं आहे, ज्यामुळं नवीन सरकार स्थापनेचे प्रयत्न वेगवान झाले आहेत. आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका आणि चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, नवीन बिहार सरकारच्या मंत्रिमंडळात प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांच्या संख्येबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांच्या संख्येच्या आधारे, प्रत्येक पक्षाच्या एका मंत्र्याचा नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.

आज नितीश सरकारची अंतिम मंत्रिमंडळ बैठक :

सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं मानलं जात आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी 11:30 वाजता नितीश कुमार मंत्रिमंडळाची अंतिम बैठक होणार असल्याचंही वृत्त आहे. सकाळी 11:30 वाजता सुरु होणाऱ्या बैठकीत सरकारचा राजीनामा प्रस्ताव मंजूर केला जाईल. यानंतर नितीश कुमार राज्यपालांना भेटून राजीनामा सादर करतील. त्यानंतर ते नवीन सरकार स्थापनेचा प्रस्ताव सादर करतील.

सहा आमदारांसाठी एक मंत्रीपदाचा फॉर्म्युला :

अनेक बैठकांमध्ये, एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की सरकार स्थापनेचे सर्व काम एक ते दोन दिवसात पूर्ण होईल. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पक्षाला प्रत्येक सहा आमदारांसाठी एक मंत्रीपद मिळू शकते. हा फॉर्म्युला सर्व पक्षांमध्ये लागू केला जाऊ शकतो. या मुद्द्यावर एनडीए घटक पक्षांमध्ये एकमत होत असल्याचं दिसून येत आहे.

कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळू शकतात :

भाजपा – 15/16
जेडीयू – 14/15
एलजेपी (आर) – 3
आरएलएम – 1
एचएएम – 1

हे ही वाचा – “कोणी स्वत:ला बाहुबली समजू नये, अशा अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलं;” प्रफुल्ल पटेल यांचा रोख भाजप नेत्यांवर?

चिराग पासवान काय म्हणाले? :

बिहारमधील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री आणि एलजेपी प्रमुख चिराग पासवान म्हणाले, “ते लवकरच होईल. चर्चा सुरु आहे. सरकारच्या आराखड्याबद्दल स्पष्टता येईल. मला वाटतं की आज रात्रीपर्यंत मी वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांशीही बोलेन आणि आज किंवा उद्यापर्यंत आराखडा तयार होईल. 22 नोव्हेंबरपूर्वी आपल्याला सरकार स्थापन करायचं आहे. ते होईल.”

बिहारमध्ये एनडीएचा अभूतपूर्व विजय :

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं अभूतपूर्व विजय मिळवला आहे. 243 जागांच्या विधानसभेत एनडीएनं 202 जागा जिंकल्या, तर विरोधी महाआघाडी फक्त 35 जागांवर निवडून आली. बिहारच्या राजकीय इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts