Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “कोणी स्वत:ला बाहुबली समजू नये, अशा अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलं;” प्रफुल्ल पटेल यांचा रोख भाजप नेत्यांवर?
Top News

“कोणी स्वत:ला बाहुबली समजू नये, अशा अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलं;” प्रफुल्ल पटेल यांचा रोख भाजप नेत्यांवर?

घरी बसून कोणी मतदान करणार नाही. यासाठी रस्त्यावर उतरून वातावरण तयार करा. कोणी स्वत:ला बाहुबली समजत असेल तर, आम्ही अशा अनेक बाहुबलींना निवडून आणलेलं आहे,” अस वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता या चर्चा सुरू झाल्या आहेत. नुकताचं बिहार विधानसभेचा निकाल हाती आला आहे आणि भाजपच्या डोक्यात विजयाची हवा गेली असल्याने त्यांनी असे विधान केल्याचे बोललं जात आहेत. त्यामुळे हा एकप्रकारे भाजप नेत्यांना तर इशारा देण्याचा प्रकारन नाही ना? अशा चर्चा सध्या राज्यात रंगत आहेत.

निवडणुकीसाठी पैसे लगातत. आपण महायुतीत असलो तरी, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पैशांच्या पुढे कुणी म्हणत असेल की मी निवडून आलोच तर असं होत नाही. आपण सक्षम आहोत, इतरांना आपली चिंता करावी लागेल. समझनेवालो को इशारा काफी है, असं वक्तव्य भंडार्‍यात पक्षाच्या कार्यक्रमात प्रफुल पटेल यांनी केलं आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे. 

हेही वाचा – “आपल्या जिभेवर आणि विधानांवर ताबा ठेवा..” भाजप खासदाराला थेट धमकी..

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक महायुती स्वबळावर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने स्वबळावर लढण्याचा विचार केला आहे. काही काही ठिकाणी जमल्यास महायुतीमध्ये अलायन्स होऊ शकते. पण, महायूतीच्या तिन्ही पक्षाने निर्णय केलेला आहे, सगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्ते खूप उत्सुक असतात. 9 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. स्वाभाविक आहे की इच्छुकांची खूप मोठी गर्दी असते. तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. त्यासोबतच स्थानिक स्तरावर काही वेगवेगळी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे तिथला निर्णय तिथेच घ्यावं लागते. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहे. एखाद ठिकाणी कुठे तडजोड करायचा प्रसंग आल्यास आम्ही तसं तडजोड करू, असं माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

पश्चिम बंगालमध्येही भाजपचं सरकार

बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील टार्गेट पश्चिम बंगालला केलं आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधून गेलेली गंगा पश्चिम बंगालमध्ये मिळते असं म्हणत पटेल यांनी ममता बॅनर्जी यांना एक प्रकारे इशारा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची नीती आणि त्यांची दिलेली योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहे. तसा एक परिणाम आणि त्याचीही पावती आहे. पश्चिम बंगालमध्ये ही फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीमध्ये ही भारतीय जनता पार्टीचं तिथे नक्कीच चांगलं प्रदर्शन राहील. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही नक्कीच वाढ होईल किंबहुना सरकारही बनू शकेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा ते गंगासागर असा दिलेला नारा योग्य असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांनी सांगितलं.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts