• Home
  • क्रीडा
  • ‘या’ खेळाडूने 10.09 सेकंदांत 100 मीटर शर्यत पूर्ण करत रचला इतिहास; भारताला मिळाला नवा स्पीडस्टार
क्रीडा

‘या’ खेळाडूने 10.09 सेकंदांत 100 मीटर शर्यत पूर्ण करत रचला इतिहास; भारताला मिळाला नवा स्पीडस्टार

Gurinderveer Singh

Gurinderveer Singh: रांची येथे पार पडलेल्या राष्ट्रीय वरिष्ठ अॅथलेटिक्स फेडरेशन स्पर्धेत भारतीय अॅथलेटिक्सला नवा स्पीडस्टार मिळाला आहे. पंजाबच्या25 सके गुरिंदरवीर सिंह वेगवान धावपटूने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत अवघ्या 10.09 सेकंदांचा वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला. या कामगिरीसह 10.10 सेकंदांच्या आत 100 मीटर शर्यत पूर्ण करणारा तो पहिलाच भारतीय धावपटू ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय अॅथलेटिक्समध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेत त्याची आणि माजी राष्ट्रीय विक्रमधारक अनिमेष कुजूर यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. ओडिशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिमेषने यापूर्वी 10.18 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम केला होता. मात्र उपांत्य फेरीत पंजाबच्या गुरिंदरवीर सिंह  धावपटूने 10.17 सेकंदांचा वेळ नोंदवत विक्रम मोडला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत अनिमेषने 10.15 सेकंदांची वेळ नोंदवत पुन्हा विक्रम आपल्या नावावर केला. त्यामुळे भारतीय अॅथलेटिक्समध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

मात्र अंतिम फेरीत गुरिंदरवीर सिंह कमाल करत सर्वांना मागे टाकले. त्याने अवघ्या 10.09 सेकंदांत शर्यत पूर्ण करत नवा इतिहास रचला. त्याने अनिमेषपेक्षा 0.11 सेकंद वेगाने धावत शानदार विजय मिळवला. अंतिम फेरीत त्याचा वेग आणि आत्मविश्वास पाहून प्रेक्षकांनीही जोरदार जल्लोष केला.

या कामगिरीमुळे त्याने 2026 राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आवश्यक पात्रता वेळही पार केली आहे. याशिवाय यंदाच्या हंगामात आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान वेळ नोंदवणारा धावपटू म्हणूनही तो चर्चेत आला आहे. जपानच्या एका धावपटूने 10.08 सेकंदांची वेळ नोंदवली असून त्यानंतर भारतीय धावपटूचा क्रमांक लागतो.

दरम्यान, पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीचा जागतिक विक्रम अजूनही Usain Bolt यांच्या नावावर आहे. त्यांनी 2009 मध्ये 9.58 सेकंदांत शर्यत पूर्ण करत जागतिक विक्रम केला होता. पंजाबमधून आलेला हा भारतीय धावपटू शॉर्ट स्प्रिंट प्रकारातील विशेषज्ञ मानला जातो. या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता त्याच्याकडे भारताचा नवा स्पीडस्टार म्हणून पाहिले जात आहे.

कोण आहे गुरिंदरवीर सिंह?

गुरिंदरवीर सिंह हा पंजाबमधील वेगवान धावपटू असून तो भारतातील आघाडीच्या ट्रॅक अँड फील्ड खेळाडूंमध्ये गणला जातो. 100 मीटर शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर त्याला आता “भारतीय इतिहासातील सर्वात वेगवान धावपटू” अशी ओळख मिळाली आहे. तो शॉर्ट स्प्रिंट प्रकारातील विशेषज्ञ मानला जातो. तसेच त्याने आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धांसाठीही पात्रता मिळवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts