Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ICC Cricket Schedule 2028-2035 : भारतात रंगणार दोन मोठ्या आयसीसी स्पर्धा! २०३५ पर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
क्रीडा

ICC Cricket Schedule 2028-2035 : भारतात रंगणार दोन मोठ्या आयसीसी स्पर्धा! २०३५ पर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

ICC Cricket Schedule 2028-2035
47
ICC Cricket Schedule 2028-2035 : भारतात २०२९ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०३१ एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन होणार. जाणून घ्या २०३५ पर्यंतच्या आयसीसी स्पर्धांचे संपूर्ण वेळापत्रक. (Game scheduled)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने २०२८ ते २०३५ या कालावधीतील प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकात टी-२० विश्वचषक, वनडे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत भारतात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार असून, भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. (International Games)

२०२८ मध्ये टी-२० विश्वचषक, २०२९ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २०२८ चा पुरुष टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये १२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. त्यानंतर २०२९ मध्ये इंग्लंडमध्ये ८ ते १२ जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होईल. याच वर्षी भारतात ९ ते २८ ऑक्टोबरदरम्यान पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे.

२०३० मध्ये इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड येथे ४ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान टी-२० विश्वचषक होणार आहे. तर २०३१ मध्ये इंग्लंडमध्ये १२ ते १६ जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. त्यानंतर ९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे वनडे विश्वचषकाचे आयोजन करतील. (Cricket Planning)

२०३२ ते २०३५ मधील स्पर्धांचे वेळापत्रक

२०३२ चा टी-२० विश्वचषक १४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. २०३३ मध्ये ९ ते १३ जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, तर २ ते २३ ऑक्टोबरदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाईल. २०३४ चा टी-२० विश्वचषक ६ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत होईल. (Timetable of Games)

२०३५ मध्ये ७ ते ११ जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून, त्याच वर्षी २ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. मात्र, २०३२, २०३३, २०३४ आणि २०३५ मधील काही स्पर्धांचे यजमान देश अद्याप निश्चित झालेले नाहीत. आयसीसीच्या या निर्णयामुळे आगामी आठ वर्षांतील प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांचे नियोजन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खेळाडू, क्रिकेट संघटना आणि चाहत्यांना आगामी स्पर्धांचे वेळापत्रक आधीच समजण्यास मदत होणार आहे. (LS Marathi)

हेही वाचा : Asian Para Games 2026 : भारताची पदकतालिकेत दमदार कामगिरी; ६४ पदकांसह पाचव्या स्थानावर

img

Shivani Nagarale

Content Writer

Shivani Nagarale | Digital Journalist | News Writer | Digital Content CreatorHello! I am Shivani Nagarale, a digital journalist with two years of experience in journalism and digital media. Since beginning my professional journey in 2023, I have gained experience in various aspects of media, including digital content creation, news writing, information research, and content development for digital platforms.Alongside journalism, I have developed an understanding of digital media and digital marketing, gaining insights into content performance, audience engagement, and effective ways of reaching readers across digital platforms.Currently, I am working as a Digital Journalist at Loksevay, under LS Marathi, where I contribute to digital news production, covering current affairs, diverse news topics, informative articles, and reader-focused content. My approach to journalism emphasizes thorough research, factual accuracy, objective reporting, and clear, engaging writing.I believe in continuously adapting to the evolving landscape of digital journalism, exploring emerging media trends, and strengthening my editorial skills. My professional goal is to create credible, informative, and engaging content that bridges the values of responsible journalism with the growing reach of digital media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts