Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी भारताची संभाव्य संघरचना समोर; ‘या’ खेळाडूंचा समावेश!
Top News

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी भारताची संभाव्य संघरचना समोर; ‘या’ खेळाडूंचा समावेश!

India vs Afghanistan Test 2026

India vs Afghanistan Test 2026 : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नसली तरी संभाव्य संघाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएल २०२६ संपल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना ६ ते १० जूनदरम्यान न्यू चंदीगड येथील मुल्लांपूर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध मुख्य खेळाडूंनाच संधी?

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या कसोटीसाठी भारताचा मुख्य संघच मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ही कसोटी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) चक्रात नसली तरी संघातील प्रमुख फलंदाज खेळताना दिसू शकतात.

हेही वाचा: दूधापासून ते राशनपर्यंत! 43 दिवस फरार असलेल्या नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानला मदत कोण करत होतं?

वर्कलोडबाबत मेडिकल टीमकडून हिरवा कंदील

यापूर्वी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मेडिकल टीमकडून खेळाडूंच्या वर्कलोडबाबत सकारात्मक अहवाल मिळाल्यानंतर पूर्ण ताकदीचा संघ उतरवण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

गिलकडे नेतृत्व, राहुल-यशस्वीकडे सलामीची जबाबदारी

अहवालानुसार, शुभमन गिल संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतात. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल सलामीला उतरू शकतात, तर ऋषभ पंत मधल्या फळीत संघाला बळ देताना दिसतील.

साई सुदर्शनला वगळण्याची शक्यता?

क्रमांक तीनवर खेळणाऱ्या साई सुदर्शनला संघातून वगळले जाऊ शकते. त्याऐवजी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बुमराहला विश्रांती?

गोलंदाजी विभागात काही बदल होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय आयपीएलमधील त्यांच्या वर्कलोडनंतर घेतला जाणार आहे. रणजी ट्रॉफीमध्ये प्रभावी प्रदर्शन करणाऱ्या आकिब नबीला संघात संधी मिळू शकते.

भारताची संभाव्य संघरचना

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकिब नबी, हर्ष दुबे, मोहम्मद शमी, अंशुल कंबोज.

दरम्यान, अफगाणिस्तानचा संघही या मालिकेसाठी जोरदार तयारी करत असून, भारतीय संघासमोर कडवे आव्हान उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा सामना केवळ औपचारिक न राहता रंगतदार होण्याची शक्यता क्रिकेट तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts