• Home
  • Top News
  • महिला आशिया कपला आजपासून सुरुवात; ३० ऑगस्टला भारताचा पहिला सामना
क्रीडा

महिला आशिया कपला आजपासून सुरुवात; ३० ऑगस्टला भारताचा पहिला सामना

Womens Asia Cup 2026
13
Womens Asia Cup 2026: महिला टी २० आशिया कप २०२६ ला आज, २८ ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारतासह आशियातील एकूण ८ संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरतील. स्पर्धेचा अंतिम सामना १३ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.

भारताचा समावेश गट अ मध्ये करण्यात आला असून या गटात पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँगचे संघ आहेत. तर गट ब मध्ये गतिविजेता श्रीलंका, बांगलादेश, यूएई आणि इंडोनेशिया या संघांचा समावेश आहे.

साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. दोन्ही गटांमधील गुणतालिकेतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

हेही वाचा: पाच तासांच्या बैठकीनंतरही तोडगा नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण 16व्या दिवशीही कायम

भारताचा पहिला सामना कधी? (Womens Asia Cup 2026)

भारतीय महिला संघ 30 ऑगस्टला थायलंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या आशिया कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर 3 सप्टेंबरला भारताचा सामना हाँगकाँगविरुद्ध होईल. हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार (Women’s Asia Cup schedule 2026) रात्री 8 वाजता सुरू होतील.

5 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान महामुकाबला

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात असल्याने साखळी फेरीत त्यांच्यात सामना होणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना 5 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल, तर टॉस 7.30 वाजता होणार आहे.

टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक  (Women’s Asia Cup schedule 2026)

30 ऑगस्ट: भारत विरुद्ध थायलंड — रात्री 8 वाजता
3 सप्टेंबर: भारत विरुद्ध हाँगकाँग — रात्री 8 वाजता
5 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान — रात्री 8 वाजता
भारताचे साखळी फेरीतील तिन्ही सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत.

उपांत्य फेरी आणि अंतिम सामना कधी? (Women’s Asia Cup final 2026)

आशिया कपची साखळी फेरी ८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १० आणि ११ सप्टेंबरला दोन उपांत्य सामने खेळवले जातील. या सामन्यांतील विजेते संघ १३ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात (Women’s T20 Asia Cup 2026) आमनेसामने येतील.

महिला आशिया कपची ही १० वी आवृत्ती, तर टी-20 फॉरमॅटमधील सहावी आवृत्ती आहे. भारतीय संघाचे लक्ष्य पुन्हा एकदा आशिया कपच्या विजेतेपदावर असेल. मात्र साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts