Breaking News :
Mumbai

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा यंदाचा लूक समोर; PHOTO पाहून नजर हटणार नाही!

Chinchpokli Chintamani Ganpati 2026
1
Chinchpokli Chintamani Ganpati 2026: मुंबईतील प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यापूर्वी बाप्पाची पहिली झलक समोर आली आहे. यंदाचा चिंतामणीचा लूक भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

मुंबईतील मानाचा आणि लोकप्रिय गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज, २९ ऑगस्ट रोजी चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडणारा असून, त्याआधी बाप्पाच्या मूर्तींची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली आहे. यंदाचा चिंतामणीचा लूक अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न दिसत असून, बाप्पाचे हे रूप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत. गणरायाच्या आगमनाची भक्त आतुरतेने वाट पाहत असून, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सार्वजनिक गणेश मंडळाकडून सजावट, आरास आणि आगमन सोहळ्याच्या नियोजनाला सुरुवात झाला आहे.

हेही वाचा: पैसा, प्रगती आणि आनंद! आज ‘या’ राशींसाठी उघडणार यशाचे नवे दरवाजे

यंदा गणेश चतुर्थी कधी?

यंदा गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वत्र साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यासह राज्यातील विविध भागांमध्ये गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळाच्या आगमन सोहळ्यांकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.

दरवर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. बाप्पाच्या आगमन सोहळ्याला मोठी गर्दी होत असल्याने प्रशासन आणि पोलिसांकडूनही आवश्यक नियोजन केले जात आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन ( Chinchpokli Chintamani Ganpati 2026 )

याच पार्श्वभूमीवर आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा उत्साहात पार पडणार आहे. त्यापूर्वी मंडळाने बाप्पाच्या मूर्तीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यंदाच्या मूर्तीचे रूप साधे, गोड आणि भक्तांचे लक्ष वेधून घेणारे आहे.

बाप्पाची झलक ( Chinchpokali Chintamani )

मंडळाने बाप्पाची झलक शेअर करताना ‘यंदाचा थाट… यंदाचं रूप… यंदाचा चिंतामणी!’ असा खास उल्लेख केला आहे. चिंतामणीचे हे मनोहारी रूप पाहून गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगमन सोहळ्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

मुंबईतील गणेशोत्सवाची सुरुवातच मोठ्या उत्साहात होत असताना चिंतामणीच्या आगमन सोहळ्याकडे यंदाही हजारो भाविकांचे लक्ष लागले आहे. आता आजच्या आगमन सोहळ्यात बाप्पाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts