• Home
  • महाराष्ट्र
  • अमरावती हादरली! 65 वर्षीय महिलेवर तरुणाने केला बलात्कार, धक्कादायक घटना उघडकीस
Top News

अमरावती हादरली! 65 वर्षीय महिलेवर तरुणाने केला बलात्कार, धक्कादायक घटना उघडकीस

crime 2

Amravati Crime | काही दिवसांपूर्वीच अमरावती (Amravati) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. अमरावतीमधील परतवाडा (Paratwada) येथील आरोपी अयान अहमदने 180 तरूणींचे लैंगिक शोषण करत काही अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकिकडे या घटनेचे पडसाद राज्यभारत उमटत असताना आता आणखी एक हादरवणारी घटना परतवाड्यात घडली आहे. एका तरूणाने 65 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे, ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – उत्तर कोरियाचा जगाला इशारा? दुसऱ्या दिवशीही क्षेपणास्त्र डागले, मिसाइल चाचण्यांमागचं कारण काय?

22 वर्षीय तरुणाने वृद्ध महिलेवर केला बलात्कार

एका 22 वर्षीय तरुणाने 65 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आवेज युसुफ खान असं आरोपीचं नाव आहे. तर आरोपी आवेज खानवर वृद्ध महिलेवर अत्याचार करत पैसे लुटल्याचा आरोप करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं घडलं काय?

शनिवारी (18 एप्रिल) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पीडित वृद्ध महिला ही उपचारासाठी रूग्णालयात जात होती. त्यादरम्यान आरोपी आवेज खानने तिला रूग्णालयापर्यंत सोडतो म्हणत तिला दुचाकीवर बसवले. त्यानंतर आरोपीने वृद्ध महिलेला एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे नेल्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर त्याने तिच्याकडे असलेले 600 रूपये हिसकावून घेतले आणि तिथून पळ काढला.

या धक्कादायक घटनेनंतर पीडित वृद्ध महिलेला अचलपूर उपजिल्हा रूग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी शिरजगाव कसबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी आवेज खानचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात 180 तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने तरूणींसोबत शरीरसंबंध ठेवत व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. तर त्याने हे व्हिडीओ व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केले होते. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज उर्फ मोहम्मद तनवीर यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts