BACCHU KADU NEWS: राज्यातील नेते बच्चू कडू यांनी शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश केल्यापासून राजकारण चांगलेच रंगताना दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच बच्चू कडू यांच्यावर टीकास्त्र सोडताना, “त्यांना घरी बोलावून मंत्रीपद दिलं, ती माझी चूक होती,” अशी खंत व्यक्त केली होती. तसेच स्वार्थासाठी साथ सोडणाऱ्यांपेक्षा निष्ठावान कार्यकर्तेच आपली खरी ताकद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर प्रहार पक्षातील नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठक घेतली. यावेळी या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. आमदार अंबादास दानवे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हेदेखील त्यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला . “बच्चू कडू यांनी आपल्याला विकून टाकलं आणि मिंधे सेनेत प्रवेश केला. आपण स्वाभिमानी असल्यामुळे ठाकरेंच्या सोबत आलो आहोत. यापुढे नेहमी ठाकरेंच्या सोबत राहू “,असं यावेळी कार्यकर्त्यांनी म्हटलं.
बच्चू कडू यांचा पलटवार
काल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे.” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते याला आता प्रत्युत्तर देत ” आमच्या मतांच्या जोरावरच तुम्ही मुख्यमंत्रीपदी पोहोचलात. आम्ही स्वतः पुढाकार घेऊन तुमच्या घरी आलो आणि पाठिंबा दिला होता,” असे जोरदार प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी आज एका माध्यमांशी बोलताना दिले आहे. तसेच आधी मुख्यमंत्री होतो का मंत्र होतो? असा खोचक टोला देखील लागवलेला आहे.
ठाकरेंनी फसवले
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मला फसवले असे देखील बच्चू कडू म्हणले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, मात्र राज्यमंत्रिपद दिलं. माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असा खळबळजनक दावा देखील बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच शिंदेसोबत गुवाहाटी ला जाताना उद्धव साहेबाना विचारून ग्रेलो होत असे देखील बच्चू कडू म्हणले आहेत. उद्धव ठाकरे माझ्याबद्दल जे काही बोलले ते मनापासून बोलले असं वाटत नाही. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं, मग आम्ही चूक केली असं म्हणणार का? असा सवालही यावेळी बच्चू कडू यांनी ठाकरेंना केला आहे.












