Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाजप युवा मोर्चा आक्रमक, काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Top News

भाजप युवा मोर्चा आक्रमक, काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

BJP Yuva Morcha aggressive

BJP Yuva Morcha aggressive : मुंबईत भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. युवा मोर्चाच्या कार्यकर्ते मालवणीत एकत्र आले होते, याचा भागात काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचं कार्यालय असल्याची माहिती पुढे आली आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप आंदोलकांकडून करण्यात आला असून त्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

आंदोलकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांची प्रचंड मोठी गर्दी जमा झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनसथित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. मालाड मालवणी पोलीस ठाण्यात अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आंदोलकांनी गेली.

हेही वाचा – शिवस्मारक अनावरण प्रकरण! गुन्हाची नोटीस घेयला अमित ठाकरे थेट ठाण्यात, मनसैनिकांची तोबा गर्दी

अस्लम शेख यांचे बॅनर्स फाडण्याचा प्रयत्न

विशेष म्हणजे भाजपच्या आंदोलकांनी मलाड मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर देखील जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांकडून पोलीस ठाण्याच्या बाहेर दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं. तसेच आंदोलकांकडून परिसरातील अस्लम शेख यांचे बॅनर्स फाडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. आंदोलकांचा एक गट जास्त आक्रमक झालेला बघायला मिळाला.

वादाला सुरवात कशी झाली ?

मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचताना दिसत आहे. भाजप नेते अमित साटम यांनी अस्लम शेख यांच्यावर सडकून टीका केली होती. अस्लम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप करत भाजपकडून अस्लम शेख यांच्यावर टीका केली जात होती. यातूनच अमित साटम यांनी खोचक शब्दांत अस्लम शेख यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंधेरी येथे अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. यावेळी अस्लम शेख यांच्याकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप भाजप कार्यकत्यांकडून केला जात आहे. त्यांच्या त्या वक्तव्याविरोधात आजचे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts