Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा डोनाल्ड ट्रम्प यांना गंभीर इशारा; तैवान मुद्द्यावरू राजकीय वातावरण तापलं
Top News

चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा डोनाल्ड ट्रम्प यांना गंभीर इशारा; तैवान मुद्द्यावरू राजकीय वातावरण तापलं

Xi Jinping On Donald Trump | सध्या चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) महत्त्वाची बैठक सुरू आहे. चीनेचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात मोठी बैठक पार पडली. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. बीजिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. यानंतर दोन्ही देशांच्या नेतृत्वाची बैठक झाली. ट्रम्प आणि शी जिनपिंग या दोघांनीही अमेरिका आणि चीन यांच्यातील मैत्री अधिक दृढ करण्याबद्दल चर्चा केली. मात्र, या बैठकीदरम्यान शी जिनपिंग यांनी तैवानच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांना गंभीर इशारा दिला आहे.

हेही वाचा – मुंबईकरांनो आता खर्च करा जपून; CNG दरात पुन्हा वाढ, खिशाला बसणार कात्री, जाणून घ्या नवीन दर

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, जर तैवानचा मुद्दा योग्यरित्या सोडवला नाही, तर दोन्ही देशांमधील संघर्ष वाढू शकतो. दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत धोकादायक बनू शकतात, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.

जर तैवानचा मुद्दा योग्यरित्या हाताळला गेला, तर द्विपक्षीय संबंध नेहमीप्रमाणे स्थिर राहू शकतात. पण जर तो योग्यरित्या हाताळला नाही, तर दोन्ही देश संघर्ष किंवा अगदी संघर्षाच्या परिस्थितीत पोहोचू शकतात, ज्यामुळे संपूर्ण चीन-अमेरिका संबंध एका अत्यंत धोकादायक वळणावर येतील, असा थेट इशारा शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, चीनने आणि अमेरिकेने प्रतिस्पर्धी न राहता भागीदार असले पाहिजे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या यशात योगदान द्यावे आणि एकत्रितपणे प्रगतीचा पाठपुरावा करावा, असंही शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts