Shocking incident : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस (Shocking incident revealed) आला आहे. बोरकर लेआऊट येथील अंगणवाडीत चार वर्षीय चिमुकला रात्रभर कोंडला (Four-year-old toddler stranded at Anganwadi) गेल्याची घटना समोर आली आहे. सकाळी कुलूप उघडल्यावर सुदैवाने सुरक्षित अवस्थेत (Fortunately, found safe) आढळून आला. मात्र, अंगणवाडी सेवकेच्या या कारभारमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा – उद्यापासून १०वी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात, १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थांची नोंदणी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार वर्षीय चिमुकला संध्याकाळच्या सुमारास खेळत खेळत अंगणवाडीच्या मागील बाजूच्या खोलीत गेला. खेळता खेळता त्याला तिथेच झोप लागली. दरम्यान, अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे शाळा बंद करताना सर्व खोल्यांची व्यवस्थित पाहणी न करता कुलूप लावलं. त्यामुळे मुलगा आतच राहिला. सायंकाळी मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. परिसरात चौकशी, नातेवाईकांकडे संपर्क अशा सर्व शक्यता पडताळूनही त्याचा पत्ता लागला नाही.
पोलिसांनी तातडीने 7 पथके तयार केली
परिस्थिती गंभीर बनल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिसांनी नियमानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने 7 पथके तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं, अवतीभवतीच्या भागात शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र मुलाचा शोध लागला नाही.
अंगणवाडी उघडण्यात आली वेगळंच चित्र दिसलं
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणवाडी उघडण्यात आली असता आत वेगळंच चित्र दिसलं. मुलगा अंगणवाडीत सुरक्षित अवस्थेत आढळून आला. रात्रभर तो खोलीतच अडकून होता. सुदैवाने त्याला कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी शाळा आणि अंगणवाडी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. शाळा बंद करताना प्रत्येक खोलीची काटेकोर तपासणी करणे आवश्यक असून, अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.












